AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्याकडं चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप, नबाव मलिकांचा भाजपला इशारा; काँग्रेसचे 10 नगरसेवक राष्ट्रवादीत

नवाब मलिक यांनी भाजपला यावेळी फटकारलं.  शरद पवार साहेब संपले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही जण तुमच्याकडे चाणक्य आहे, असं म्हणतात मात्र, आमच्याकडे मात्र तालमीतला बाप आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

तुमच्याकडं चाणक्य तर आमच्याकडं तालमीतला बाप, नबाव मलिकांचा भाजपला इशारा; काँग्रेसचे 10 नगरसेवक राष्ट्रवादीत
नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 11:45 AM
Share

मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत आहे. स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांनी पक्ष विस्ताराचं धोरण कायम ठेवलंय. परभणी जिल्हा सोनपेठ तालुका येथील सोनपेठ नगरपालिका काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं आहे. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड गट नेते सोनपेठ शहर व यांच्यासह काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री जयंत पाटील,मंत्री नवाब मलिक ,युथ राष्ट्रवादी काँग्रेस मेहबूब शेख यांच्या उपस्थित जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमावेळी नवाब मलिक यांनी मार्गदर्शन केलं. नवाब मलिक यांनी भाजपला यावेळी फटकारलं.  शरद पवार साहेब संपले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही जण तुमच्याकडे चाणक्य आहे, असं म्हणतात मात्र, आमच्याकडे मात्र तालमीतला बाप आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला

परभणीचे पालकमंत्री आणि अल्पसंख्यांक मत्री नवाब मलिक यांनी यावेळी सोनपेठ येथे दौऱ्या मध्ये मी गेलो होतो त्यावेळी चंद्रकांत राठोड यांनी पक्ष वाढवण्याचे काम केले आहे ते पाहिल्याचं म्हटलं. परभणी हा राष्ट्रवादीचा पहिल्या पासून बालेकिल्ला राहिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्यावतीनं त्या जिल्ह्यातील अनेक कामे केली. अनेक प्रश्न सोडवले आहेत कोरोनामध्ये होम क्वारंटाईन असेल या कोविड बाबत अनेक कामे केली करण्यात आली, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

शरद पवार संपल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं

नवाब मलिक यांनी बोलताना राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी भाजपची दडपशाही होती. अर्धे लोक तुरुंगात जातील असं ते म्हणतात मात्र आम्ही घाबरत नाही. आमच्या नेत्यांच्या मागं ईडी आणि सीबीआय लावली आहे, त्याचा सामना करु, असं मलिक म्हणाले. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत कट कारस्थान करण्यात येत होतं. शरद पवार साहेब संपले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही जण तुमच्याकडे चाणक्य आहे, असं म्हणतात मात्र, आमच्याकडे मात्र तालमीतला बाप आहे, असं नवाब मलिक म्हणाले. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही झोपतो पण आणि झोप उडवतो, असा इशारा नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे. राष्ट्रवादीची ताकद वाढली पाहिजे.नव्यानं लोक या पक्षात येतात त्यामुळे या पक्षात कोणताही नवा जुना वाद होणार नाही, याची काळजी घ्या, असं नवाब मलिक म्हणाले.

परभणीत राष्ट्रवादीचा खासदार करण्याची संधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात बोलताना परभणीत आपली ताकद आणखी वाढणार असल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत राठोड यांच्यामुळे सर्व बदल झाल्याचं दिसून येत आहे. परभणीतील राष्ट्रवादीची ताकद पाहता या जिल्ह्यात आपला खासदार निवडून येऊ शकतो, असं म्हटलंय. शरद पवार यांना तरुण नेतृत्व दिल्लीला जावे असे पवार साहेबांना वाटत होते. राजेश विटेकर यांना आम्ही सतत सांगत आलो तुम्ही काम करत रहा. राजेश विटेकर यांच्या मागे सर्व राष्ट्रवादीचे लोक आहेत, असंही पाटील म्हणाले.

संपूर्ण बंजारा समाज या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे.या समाजाला आवश्यक असणाऱ्या योजना आपल्याला करता येईल. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे देखील या ठिकाणी येणार होते मात्र ते काही कारणांमुळं आले नाहीत. परभणीत नव्या चेहऱ्याला स्थान देण्याचे काम या जिल्ह्याने केले तर चांगले पाठबळ मिळेल, असं जयंत पाटील म्हणाले. लोकसभा आणि विधान सभेत आपण कमी पडलो त्या साठी सर्वांनी येणाऱ्या काळात जोमाने काम, असं जयंत पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला, बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला:संजय राऊत

‘वाहतुकीची सोय करा, कोरोना नियम पाळा,’ NAS सर्वेक्षणासाठी 12 नोव्हेंबरला शाळा सुरु ठेवण्याचे आदेश

Nawab Malik slam BJP leaders at the time of Congress ten Municipal Council members join NCP

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.