प्रज्ञा ठाकूरच्या दाव्याची नवाब मलिक यांच्याकडून पोलखोल

प्रज्ञा ठाकूरच्या दाव्याची नवाब मलिक यांच्याकडून पोलखोल


मुंबई : बाबरी मशीद पाडताना प्रज्ञा ठाकूरचे वय साडेतीन वर्ष होते. मग बाबरी मशीद कशी काय पाडली?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन केला आहे. नुकतेच टीव्ही 9 भारतवर्षच्या मुलाखतीमध्ये प्रज्ञा ठाकूरने, ‘मी बाबरी मशिदीवर फक्त चढली नव्हती, तर ती पाडण्यासाठी मदतही केली होती, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

“प्रज्ञा ठाकूर यांचा जन्म 2 एप्रिल 1988 रोजी झाला. बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली. यावेळी प्रज्ञा ठाकूर साडेतीन वर्षाची होती आणि स्वत: बाबरी मशिदीवर चढण्याचा दावा प्रज्ञा ठाकूर यांचा खोटा आहे. लोक 1 एप्रिलला जन्माला आले नाहीत”, अशी खिल्ली नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरुन उडवली.


काही दिवसांपूर्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. शहिद हेमंत करकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रज्ञा ठाकूर यांची गोची झाली होती, तर देशभरातून त्यांच्यावर टीकाही केली जात होती. मात्र आता पुन्हा बाबरी मशिदीवर वादग्रस्त विधान केल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटर अकाऊंटवरुन प्रज्ञा ठाकूरला प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रज्ञा ठाकूर मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आहे. सध्या जामीनावर त्या बाहेर असून भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार आहेत.

संबधित बातम्या : 

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली

‘भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI