भाजप चोरांचा बाजार, सोमय्या बॅन्ड बाराती; तपास यंत्रणेवरून मलिकांचा टोला

भाजप हा पक्ष महाराष्ट्रातील चोरांचा बाजार आहे, तर किरीट सोमय्या हे त्याचे बॅन्ड बाराती आहेत. माझ्याविरोधात तपास यंत्रणांना कितीही कारवाया करायला सांगितल्या तरी मला काहीही फरक पडत नसल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

भाजप चोरांचा बाजार, सोमय्या बॅन्ड बाराती; तपास यंत्रणेवरून मलिकांचा टोला
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 20, 2021 | 12:20 PM

बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा देवेद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच इडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांना माझ्याविरोधात कारवाईच्या सूचना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. फडणवीसांनी स्व:ताला तपास यंत्रणाचा ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावे, तसेच किरीट सोमय्या यांना प्रवक्तेपद देण्यात यावे असा टोला देखील यावेळी मलिक यांनी लगावला आहे.

किरीट सोमय्यांना टोला

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, भाजप हा पक्ष महाराष्ट्रातील चोरांचा बाजार आहे, तर किरीट सोमय्या हे त्याचे बँड बाराती आहेत. माझ्याविरोधात तपास यंत्रणांना कितीही कारवाया करायला सांगितल्या तरी मला काहीही एक फरक पडत नाही. मी कोणालाही घाबरत नाही. राज्यात भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात सूडबुद्धीने तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत आहे.

पहिले आप

दरम्यान त्यांनी यावेळी अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यावर देखील टीका केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार मजबूत असून, सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे त्यांनी म्हटले आहे. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे अमित शाह यांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी शाह यांना टोला लगावला आहे. खरतर लोकसभेची निवडणूक विधानसभेच्या आधी झाली होती, त्यामुळे शाह यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, पहिले आप म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली.

संबंधित बातम्या 

VIDEO: आमदार, मंत्री झाला तरी पालिकेत जीव कसा घुटमळतोय, आता जीव मोकळा करा; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर हल्लाबोल

VIDEO: हे ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येतं, मोदींच्या प्रश्नावर राऊत का भडकले?

Elections: 2019 च्या निवडणुकीत जनतेनं तुम्हाला औकात दाखवून दिलीय, धनंजय मुंडे यांची जहरी टीका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें