‘आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांकडून भाजप क्लीन बोल्ड’

'आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्याकडून भाजप क्लीन बोल्ड झालं' अशा शब्दात नवाब मलिक यांनी नितीन गडकरींना उत्तर दिलं.

'आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवारांकडून भाजप क्लीन बोल्ड'

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘राजकारण आणि क्रिकेट यात काहीही शक्य आहे’ असं म्हणत महाविकासआघाडीवर टाकलेल्या बाऊन्सरवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सिक्सर लगावला आहे. ‘आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या शरद पवार यांच्याकडून भाजप क्लीन बोल्ड झालं’ अशा शब्दात मलिक यांनी गडकरींना (NCP answers Nitin Gadkari) उत्तर दिलं.

‘नितीन गडकरी म्हणत होते की क्रिकेट आणि राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. कदाचित ते विसरले असतील की शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत, केलं की नाही क्लीन बोल्ड’ असं म्हणत नवाब मलिक यांनी गडकरींना खिजवलं. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर मलिक यांनी ट्वीट केलं.

काय म्हणाले होते नितीन गडकरी?

क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, हातातली मॅच जात आहे, असं वाटत असतानाच बाजी पलटते, असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं.

‘कधीतरी तुम्हाला वाटतं सामना तुमच्या हातून निसटत चालला आहे. पण अंतिम निकाल अगदी उलट लागतो. मी दिल्लीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा फारसा संबंध येत नाही’ असं गडकरी 14 नोव्हेंबरला दिल्लीतील एका कार्यक्रमात म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीन गडकरी यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली होती. “काही दिवसांपूर्वी मी ‘राजकारण आणि क्रिकेट यात काहीही अशक्य नाही’, असं बोललो होतो ते खरं ठरलं, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार बनले ते स्थिर सरकार असेल, हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा मला विश्वास आहे, माझ्या नवीन सरकारला शुभेच्छा” असं गडकरी (NCP answers Nitin Gadkari) म्हणाले होते.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI