शरद पवारांसमोर उमेदवाराच्या एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात शिवबंधन

डहाकेंना (NCP Prakash Dahake) शिवबंधन सोडून घड्याळ बांधण्यासाठी सांगितलं. मात्र उमेदवार प्रकाश डहाके यांनी शरद पवार यांच्यासमोरच एका हाताला घड्याळ बांधलं. शिवबंधन सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरद पवारांसमोर उमेदवाराच्या एका हातात घड्याळ, दुसऱ्या हातात शिवबंधन

वाशिम : तिकीट मिळण्यासाठी अनेक नेत्यांनी पक्ष बदलला. मात्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघ युतीत भाजपला सुटल्याने शिवसेनेचे प्रकाश डहाके (NCP Prakash Dahake) राष्ट्रवादीत गेले. त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीटही देण्यात आलंय. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी डहाकेंना (NCP Prakash Dahake) शिवबंधन सोडून घड्याळ बांधण्यासाठी सांगितलं. मात्र उमेदवार प्रकाश डहाके यांनी शरद पवार यांच्यासमोरच एका हाताला घड्याळ बांधलं. शिवबंधन सोडणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली होती. पण ऐनवेळी आलेल्या डहाके यांनाच राष्ट्रवादीकडून पसंती देण्यात आली. शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्याने ऐनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांनी शिवबंधन काढून हातावर घड्याळ बांधल्याने ठाकरे समर्थकांमधून नाराजीचा सूर उमटला होता.

प्रकाश डहाके 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते, तर 2014 ला तिकीट कापून माजी मंत्री सुभाष ठाकरे यांना तिकीट दिल्यामुळे नाराज डहाके यांनी 2014 मध्ये अपक्ष लढून चौथ्या क्रमांकाची मते घेतली.

तीन वर्षांपूर्वी खासदार भावना गवळी यांनी प्रकाश डहाके यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. डहाके यावेळी युतीतून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार होते. मात्र युतीत ही जागा भाजपला सुटल्याने डहाके यांची अडचण झाली. त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आणून अर्ज दाखल केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *