संग्राम जगतापांना धक्का, राष्ट्रवादीच्या नेत्याची अचानक युतीच्या व्यासपीठावर एंट्री

अभिषेक कळमकर यांची अचानक व्यासपीठावर एंट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक कळमकर आणि संग्राम जगताप गटामध्ये वाद सुरु होते.

संग्राम जगतापांना धक्का, राष्ट्रवादीच्या नेत्याची अचानक युतीच्या व्यासपीठावर एंट्री

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे उमेदवार संग्राम जगताप (Sangram Jagtap Abhishek Kalamkar) यांना निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. कारण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर अभिषेक कळमकर (Sangram Jagtap Abhishek Kalamkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. अभिषेक कळमकर यांची अचानक व्यासपीठावर एंट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक कळमकर आणि संग्राम जगताप गटामध्ये वाद सुरु होते.

अहमदनगरचे शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा झाली. यावेळी खासदार सुजय विखेही उपस्थित होते. नगर जिल्ह्यात 12-0 असा निकाल लावायचा असल्याचा पुनरुच्चार विखेंनी केला. तर हे शहर गुंडगिरीपासून मुक्त करणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोण आहेत अभिषेक कळमकर?

अभिषेक कळमकर यांचे काका माजी आमदार दादाभाऊ कळमकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. अहमदनगरला राष्ट्रवादीच्या दोन गटातील वाद उफाळून आला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.

या पार्श्वभूमीवर कळमकर यांनी पत्रकार परिषद घेऊन येथून पुढे अशा प्रकारे गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा कोणाचं नाव न घेता दिला. शिवाय प्रत्येक गोष्टीचा अंत आहे म्हणून आम्ही शांत आहोत, असं म्हणत कोणावर असा प्रसंग घडणार नाही यासाठी मी स्वतः उभा राहिल, असं त्यांनी म्हटलं होतं.

कळमकर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी समजूत काढल्याने अभिषेक कळमकर माघारी परतले. त्यामुळे वाद नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

कळमकर हे नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. राष्ट्रवादीचा मेळावा संपल्यानंतर कळमकर हे कार्यालयातून बाहेर पडत होते. यावेळी बाहेर असलेल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी कळमकर यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आमदार संग्राम जगताप यांच्यासमोरच हा प्रकार घडला. नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *