Ajit Pawar | सीटिंग जागा कोणाला मिळणार? अजित पवार यांचं अत्यंत महत्त्वाच वक्तव्य

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार? निलेश लंकेंबाबत काय वाटतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती आहे. त्यासाठी अजित पवार यांनी सातारा प्रिती संगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं.

Ajit Pawar | सीटिंग जागा कोणाला मिळणार? अजित पवार यांचं अत्यंत महत्त्वाच वक्तव्य
ajit pawar
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 9:20 AM

सातारा : “सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा? कसं काम करायच? हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिलं. त्यांनी अनेक पद भूषवली. तोच आदर्श आम्ही नवीन पिढीने ठेवला पाहिजे. सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. कोणी खेकडा म्हणत, कोणी वाघ म्हणत, अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत” असं अजित पवार म्हणाले. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 111 वी जयंती आहे. अजित पवार यांनी सातारा प्रिती संगम येथे येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या बैठकी संदर्भातही अजित पवारांनी भाष्य केलं. “आज दिल्लीत बैठक नाहीय. काल बैठक होणार होती. पण भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक होती. त्यामुळे कालची महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली. ती बैठक आज किंवा उद्या होऊ शकते” असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतील? हा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, “प्राथमिक चर्चा केली. तिन्ही पक्ष एकत्र बसलो होतो. त्यावेळी प्रत्येक पक्षाचा मान-सन्मान राखला जाईल, समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे” शिंदे गटात असलेल्या विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.

‘त्याबाबतच चित्र आम्हालाही स्पष्ट कराव लागेल’

“विजय शिवतारेंबाबत बोलायच नाहीय. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. राष्ट्रवादी, भाजपा आणि शिवसेना तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वातावरण खराब होईल, गढूळपणा येईल अशी वक्तव्य करु नयेत, ही माझी भावना आहे” असं अजित पवार म्हणाले. सातारा राष्ट्रवादीचा स्थापनेपासून बालेकिल्ला आहे. साताऱ्याची जागा राष्ट्रवादीला मिळणार का? यावर अजित पवार म्हणाले की, “बहुतेक सीटिंग जागा, ज्याला त्याला सोडायच्या अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. त्याबाबतच चित्र आम्हालाही स्पष्ट कराव लागेल, 14-15 तारखेला अचारसंहिता लागू होईल”

निलेश लंकेंबाबत अजित पवार काय म्हणाले?

निलेश लंकेबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत काही तथ्य नाही, असही ते म्हणाले. आम्ही कोणी चर्चा केली नाही, शरद पवार गटात जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. पण त्यात अजिबात तथ्य नाहीय असं अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.