आधीच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकाराशी संबंध, महाविकासआघाडीला अहंकार नाही, मिटकरींचा हल्लाबोल

भाजपाच्या तुषार भोसले यांनी केलेल्या वक्त्यावर मिटकरींनी सडेतोड उत्तर दिलं. (Amol Mitkari criticism Tushar Bhosale on Temple Reopen comment)

आधीच्या मुख्यमंत्र्यांचा अहंकाराशी संबंध, महाविकासआघाडीला अहंकार नाही, मिटकरींचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 5:09 PM

मंबई : “ज्यांच्यात अंहकार भरलेला आहे, त्यांनी दुसऱ्यांवर टीका करु नये. आताचे मुख्यमंत्री आणि आधीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये फार मोठा फरक आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये अहकांराचा संबंध असू शकतो,” अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली. भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केलेल्या वक्त्यावर मिटकरींनी सडेतोड उत्तर दिलं. (Amol Mitkari criticism Tushar Bhosale on Temple Reopen comment)

“ज्यांच्या नसानसात अहंकार भरलेला आहे, ती लोक आता दुसऱ्यावर टीका करु नये. दहावेळा स्वतला फक्त हिंदुत्वाचे पाठीराखा असल्याचे प्रमाणपत्र देऊ नये. दिवाळीनंतर यावर सकारात्मक निर्णय होईल, हे मी गेल्यावेळीच सांगितलं होतं.”

“आताचे मुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री यात फार मोठा फरक आहे. आधीच्या मुख्यमंत्र्यांचा आणि अहंकारचा संबंध असू शकतो. महाविकासआघाडीतील कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला अहंकार आहे, या मताला मी आक्षेप घेतो,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

“सरकार हे सकारात्मक आहे. जनतेची काळजी घेणार आहे. भाजपने याचे श्रेय घेऊ नये. जनतेच्या आरोग्याची काळजी महाविकासआघाडी सरकारला आहे. संत म्हणवून घेताना यांच्यात किती अहंकार आहे हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं आहे,” असा टोलाही मिटकरींनी लगावला.

“दरोडेखोर, टाळे तोडण्याची भाषा, वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याची भाषा वारंवार तुषार भोसलेंनी केली. अहंकार, द्वेष, मत्सर हे अहंकारी माणसाने सांगू नये. त्यांनी हे प्रामाणिकपणे स्वीकारावं. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हिंदू आहेत. सरकारही हिंदू आहे. यात दबावाचा काहीही संबंध नाही,” असेही अमोल मिटकरी म्हणाले.

तुषार भोसलेंची प्रतिक्रिया 

“मी या निर्णयाचं स्वागत करतो. गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील भाविकांनी जो प्रतिसाद दिला. तसेच यासाठी जी आंदोलन केली, या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आणि सरकारचा अहंकार अखेर त्यांना घालवावा लागला. अहंकार घालवण्याची ताकद मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रींची इच्छाच होती. त्यांनी तो घालवला. आणि पाडव्याच्या मूहूर्तावर मंदिर उघडली गेली. ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे,” अशी प्रतिक्रिया तुषार भोसले यांनी दिली होती.

“मुख्यमंत्री दिवाळीनंतर मंदिर उघडणार होते, मात्र आमच्या दबावामुळे त्यांना दिवाळीत मंदिर उघडावी लागली आहेत. मंदिर खुली केल्याने मिटकरींचा तिळपापड झाला आहे,” अशी टीकाही तुषार भोसले यांनी केली.

मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी 

येत्या सोमवारी (16 नोव्हेंबर) पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र प्रार्थनास्थळ खुली केल्यानंतर भाविकांना काही नियमावली पाळणे गरजेचे असणार आहे. हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. (Amol Mitkari criticism Tushar Bhosale on Temple Reopen comment)

संबंधित बातम्या : 

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला, मंदिरे सुरु करण्याच्या भाजपच्या दबावाला पडले नाहीत: प्रताप सरनाईक

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.