AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. | Chhagan Bhujbal

भाजपने पराभवातून धडा घ्यावा; ईडी, सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण आता चालणार नाही: भुजबळ
| Updated on: Dec 05, 2020 | 3:38 PM
Share

नाशिक: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने (BJP) धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवे. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. (NCP leader Chhagan Bhujbal slams Chandrakant Patil)

ते शनिवारी लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीतील पराभवावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले. काही दिवसांपूर्वी इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांचाच डाव उलटला आहे. पुण्यात मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर ते निवडून आले. मात्र, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, हे छगन भुजबळ यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली गेली नाहीत. या निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने महाविकासआघाडीला स्वीकारलेले दिसले. अगदी पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकासआघाडीच्या बाजूने कौल दिला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी जमिनीवर उतरून काम करायला हवे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

यशोमती ठाकुरांच्या इशाऱ्याला भुजबळांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याची टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून महाविकासआघाडीला इशारा दिला होता. हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी कराव, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते.

यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले. यशोमती ठाकूर काय बोलल्या ते मी वाचले नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी एकत्रितरित्या काम करतात. तेव्हा कोणी काही विचारले तर बोलावे लागते. याचा अर्थ टोचून बोलणे होत नाही.

मी शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला होता. मला कोणी याविषयी विचारले तर मी सांगतो. याचा अर्थ मी शिवसेनेवर टीका करतो, असा नाही. आता ती गोष्ट इतिहासजमा झाली. आम्ही आता राज्यात एकत्रितपणे काम करत आहोत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

‘लोकांनी फरफटत यावं अशी भाजपची इच्छा, शेवटी पेरलं तेच उगवलं’, सतेज पाटलांचा खणखणीत टोला

येत्या काळात एकट्याला सत्ता स्थापण्याची संधी; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

भाजपची कबर खोदायला सुरुवात, भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला बुडवणार, अमोल मिटकरींचा टोला

(NCP leader Chhagan Bhujbal slams Chandrakant Patil)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.