AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते; हसन मुश्रीफांचा सवाल

पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते? | Hasan Mushrif

गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते; हसन मुश्रीफांचा सवाल
| Updated on: Dec 18, 2020 | 3:51 PM
Share

कोल्हापूर: गोपीचंद पडळकर यांच्यासारखे पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिजे आहेत. पडळकर (Gopichand Padalkar) यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्याने पडळकर यांना आवरावे, असा इशारा राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिला. (Hasan Mushrif  slams Gopichand Padalkar)

ते शुक्रवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे हात धुऊन लागलेल्या गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बारामतीमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी आजच्या विरोधी पक्षनेत्यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पाच वर्षे सत्ता भोगून ते आरक्षण देऊ शकले नाहीत. तेव्हा गोपीचंद पडळकर कोणाचे चमचे होते, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

‘पडळकरांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही’

धनगर समाजासाठी आरक्षण न घेताच गोपीचंद पडळकर भाजपकडून आमदार झाले. ही कशाची बक्षिसी आहे. गोपीचंद पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. पातळ घालून नौटंकी करणारे आम्ही अनेकजण पाहिले आहेत, अशी बोचरी टीका मुश्रीफ यांनी केली.

‘पडळकरांना अजून अजित पवार कळले नाहीत’

गोपीचंद पडळकर यांना अजित पवार काय आहेत, हे अजून कळलेले नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवारांनी स्वत:ची ताकद दाखवून दिल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले.

यावेळी मुश्रीफ यांनी सरपंचपदासाठी निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याच्या निर्णयाचेही समर्थन केले. शासनाला कधीही आरक्षण काढण्याचा अधिकार आहे. कोणी न्यायालयात गेले तरी हा निर्णय टिकेल असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

अजित पवार हे दिवसाला बदलत राहणारे नेते आहेत. भाजपचं सरकार होतं तेव्हा एखादी जरी नोटीस आली तरी ते टीव्हीसमोर रडत होते. आता मात्र एखादा टग्या असल्याचा आव आणत भाषणं देत सुटले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील अजितदादांची केविलवाणी अवस्था आम्ही पाहिली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न सुरु असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडी सरकार धनगरांचा तिरस्कार करतंय, पडळकरांचा गंभीर आरोप

‘शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’, पडळकरांचं राऊतांना पत्र

अजित पवारांनी राष्ट्रवादीचा विश्वास गमावलाय- पडळकर

(Hasan Mushrif  slams Gopichand Padalkar)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.