शरद पवारांच्या प्रकृतीवर टीका, भाजपने दिलगिरी व्यक्त करावी, आम्ही बोललो तर कुठून कुठून कळा येतील : मुश्रीफ

भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर टीका केलेली (Hasan Mushrif BJP Sharad Pawar )

शरद पवारांच्या प्रकृतीवर टीका, भाजपने दिलगिरी व्यक्त करावी, आम्ही बोललो तर कुठून कुठून कळा येतील : मुश्रीफ
शरद पवार, हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीचा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणाशी संबंध जोडणं भाजपच्या मीडिया सेल प्रमुखांना महागात पडू शकतं. भाजपने दिलगिरी व्यक्त केली नाही, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी कोल्हापुरात दिला. (NCP leader Hasan Mushrif warns BJP Naveen Kumar Jindal to apologies for comment on Sharad Pawar Health)

‘भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल (Naveen Kumar Jindal) यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा येतील बघा” असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली होती.

(NCP leader Hasan Mushrif warns BJP Naveen Kumar Jindal to apologies for comment on Sharad Pawar Health)

शरद पवार यांची पोटदुखी बरी झाली असो वा नसो, लक्षात ठेवा सत्य बाहेर आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा जिंदाल यांनी काल पुन्हा दिला होता.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून पवार रुग्णालयात दाखल आहेत.

विकृतांवर कारवाईचा बडगा

दुसरीकडे, शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट्स करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडे अशा युजर्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी कालच दिली होती.

संबंधित बातम्या :

शरद पवारांच्या पोटात आत्ताच का दुखतंय, पश्चिम बंगालआधी महाराष्ट्रात सत्तांतर? भाजप नेत्याचे वक्तव्य

शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद, चालण्याचीही परवानगी

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी विकृत फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादीची सायबर पोलिसात तक्रार

(NCP leader Hasan Mushrif warns BJP Naveen Kumar Jindal to apologies for comment on Sharad Pawar Health)

Published On - 11:34 am, Fri, 2 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI