लोकशाही संपली असं जाहीर करा; अन्यथा चंद्रकांत पाटलांना माफी मागायला सांगा: नवाब मलिक

चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी. | Chandrkant Patil NCP

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:27 PM, 4 May 2021
लोकशाही संपली असं जाहीर करा; अन्यथा चंद्रकांत पाटलांना माफी मागायला सांगा: नवाब मलिक
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: न्यायालयही चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी न्यायालयाची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे  प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामिनावर सुटला आहात अशी धमकी दिली होती. नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. (NCP leader Nawab Malik slams Chandrakant Patil)

ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील अशा पध्दतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटोअंतर्गत कारवाई करावी. आजपर्यंत भाजपकडून यंत्रणांचा दुरुपयोग करण्यात येत आहे हे सिद्ध झाले आहे. आता न्यायालयसुध्दा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का, असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला. छगन भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे, अशी विचारणाही नवाब मलिक यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?

छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

कुणाकुणावर रागावणार?

छगन भुजबळांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्या धमकीची खिल्ली उडवली. ममता बॅनर्जी या झाशीच्या राणी सारख्या एकहाती लढल्या. झाशीच्या राणीने मेरी झाशी नही दुंगी असं म्हटलं होतं. ममता दीदींनीही मेरा बंगाल नही दुंगी असं म्हटलं. माझ्या या विधानावर रागावण्यासारखं काय आहे? आता पराभवाची सवय करून घेतली पाहिजे. पराभव सहन करायला हवा. आता वारंवार फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार आहात?, असा चिमटाही त्यांनी काढला.

चंद्रकांतदादांची मानसिक गडबड

समीर भुजबळ जेलमध्ये असताना चंद्रकांतदादांकडे मदत मागायला कसा जाईल? सीबीआय, ईडीचा राजकीय उपयोग होतो हे माहीत होतं. आता न्याय देवताही त्यांच्या हातात आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे ईडी किंवा सीबीआय नाही, असं सांगतानाच अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच वडाचं तेल वांग्यावर टाकण्याचा प्रकार सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लागवला.

संबंधित बातम्या:

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचा चंद्रकांतदादांवर पलटवार

‘चंद्रकांतदादा… दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून पुण्यातील मतदारसंघ निवडावा लागला’

पब्लिसिटीसाठीच काम करेन असं वागणं बरं नव्हं; नवाब मलिकांचा मोदींना टोला

(NCP leader Nawab Malik slams Chandrakant Patil)