शरद पवारांशी बाँडिंग असलेले ‘भाजपवासी’ नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ

भाजपला खिंडार पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, मात्र भाजपची सूज कमी होत असल्याची टीकाही ऱाष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी केली.

शरद पवारांशी बाँडिंग असलेले 'भाजपवासी' नेते राष्ट्रवादीत परतणार : भुजबळ
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ जवळपास दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आहेत. मात्र भुजबळांविषयी सोशल मीडियावर अनेक विनोद व्हायरल होत असतात. याचं कारणही तसंच आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सभा घेतल्या, ज्यामध्ये त्यांनी त्याच-त्याच वाक्यांचा पुनरुच्चार केला आणि सोशल मीडियावर भुजबळांविषयी विनोद व्हायरल व्हायला लागले.
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 7:48 AM

पुणे : भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे शरद पवारांसोबत बाँडिंग आहे. भाजपमधील वातावरण त्यांना पटणे शक्य नाही. त्यामुळे ते निश्‍चितपणे परत येणार, असा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. नवी मुंबई महापालिकेत आमच्या प्रयत्नांना यश येईल, असा दावाही भुजबळांनी (Chhagan Bhujbal on BJP) केला.

भाजपमधील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे शरद पवारांशी बाँडिंग आहे. भाजपमधील वातावरण त्यांना पटणे शक्य नाही. त्यामुळे सरकार आल्यानंतर ते पुन्हा येण्याची चर्चा सुरु आहे. ते निश्‍चितपणे परत येणार, असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केला. भाजपला खिंडार पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, मात्र भाजपची सूज कमी होत असल्याची टीका भुजबळ यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केली.

भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आहे. अनेक सरकार येऊन गेली, मात्र हे इतके अस्वस्थ का होतात? ही अस्वस्थता लोकांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरत असल्याची टीका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. सत्तेचा ताम्रपट घेऊन आला आहात का? असा बोचरा सवालही भुजबळांनी भाजप नेत्यांना केला.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचा दावा भाजप नेते वारंवार करत असताना छगन भुजबळ यांनी भाजप मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. सरकार नसल्यामुळे भाजप नेत्यांना झोप येत नसावी. सरकारला काम करु द्या, मग लोकच ठरवतील, आमचं काही चुकलं तर बाहेर जावं लागेल, मात्र त्यांची अस्वस्थता पहावत नाही, असा टोला भुजबळांनी लगावला.

दरम्यान, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे आठ दिवसात मिळणार आहेत. या संदर्भात कॅबिनेटमध्ये अध्यादेश काढण्याचा विषय होता. तीस लाख शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. पाच ते आठ दिवसात पैसे मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भुजबळांनी दिली.

भीमा कोरेगाव तपासावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. पोलिसांचा गैरवापर झाला असून यापेक्षा वाईट कामकाज पोलिसांचं चालतं. माझ्यावर तर अनेक खोट्यानाट्या केसेस टाकल्या. पोलिसांची भूमिका भयानक होती. काही लोक चांगलं काम करतात, मात्र काही जण वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी, प्रमोशनसाठी हे काम करतात. राजकारण्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न असेल. मात्र सत्य दडवण्यासाठी केंद्र शासनाच्या यंत्रणेचा वापर होऊ नये, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं.

‘आम्ही सत्तेत असताना भाजपने टोलमाफीसाठी प्रचार केला, मात्र टोल तर माफ झाला नाहीच, पण ज्या टोलवर आरोप झाले ते आजही चालूच आहे. आजही रस्त्यांची दुरवस्था असून तत्कालीन राज्य सरकारने एकही चारपदरी रस्ता केला नाही. मात्र रस्ते नॅशनल हायवेला देऊन त्यांनी टोल सुरु केला. परदेशातही टोल असून फास्टटॅग लागू करुन सुधारणा करायला पाहिजे’ असं म्हणत भुजबळांनी एकप्रकारे टोलला समर्थनच दिलं.

मार्च महिन्यापासून रोज एक लाख शिवभोजन थाळी दिली जाणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. शिवभोजन थाळीचा दर्जा उत्तम आहे. 18 हजारांवरुन ही योजना दुप्पट केली आहे, तर मार्च महिन्यात रोज एक लाख शिवभोजन थाळी देणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal on BJP

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.