AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | आधी खांद्यावर नाचवलं, मग जेसीबीत मिरवणूक, शिर्डीत राष्ट्रवादी आमदाराच्या समर्थकांचा जल्लोष

भोजदरी ग्रामस्थांनी आमदार डॉ. किरण लहामटेंना चक्क जेसीबीच्या पुढच्या भागावर उभे करुन त्यांची मिरवणूक काढली (NCP MLA JCB Celebration Video)

VIDEO | आधी खांद्यावर नाचवलं, मग जेसीबीत मिरवणूक, शिर्डीत राष्ट्रवादी आमदाराच्या समर्थकांचा जल्लोष
राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची जेसीबीतून मिरवणूक
| Updated on: Feb 16, 2021 | 5:24 PM
Share

शिर्डी : निवडणुकीत विजयानंतर जेसीबीतून जल्लोष करण्याचा नवा पॅटर्न राजकारणात रुजताना दिसत आहे. शिर्डीतही निवडणूक बिनविरोध जिंकल्यानंतर सरपंच आणि उपसरपंचाची जेसीबीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटेही मिरवणुकीत सहभागी झाले. आधी लहामटेंना खांद्यावर बसवून समर्थकांनी नाचवलं, नंतर जेसीबीत उभं करुन त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. (NCP MLA Dr Kiran Lahamate JCB Celebration Video)

ग्रामपंचायत निवडणुकांचा जेसीबी पॅटर्न

सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यावर त्याचा जल्लोषही अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले  विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची चक्क जेसीबीवर बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली.

भोजदरी गावातील ग्रामस्थांचा जल्लोष

एरवी एखाद्या वाहनातून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील ग्रामस्थांनी आमदारांना चक्क जेसीबीच्या पुढच्या भागावर उभे केले. गावातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला. मिरवणूक पार पडल्यावर विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

पाहा व्हिडीओ :

(NCP MLA Dr Kiran Lahamate JCB Celebration Video)

विधानसभेपासून ‘जेसीबी मे सेलिब्रेशन’ 

याआधी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत विजय मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या फाळक्यातून गुलाल उधळत सेलिब्रेशन केलं होतं. तर अहमदनगरमधील जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी प्रत्येक चौकात एक जेसीबी उभा करण्यात आला होता. 30 जेसीबींमधून गुलाल उधळून करणार रोहित पवार यांचं स्वागत करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

Photos : अहदनगरमध्ये ग्रामपंचायत निकालाचा जल्लोष, कुठं जेसीबीतून गुलाल, तर कुठं खांद्यावर मिरवणुका

रोहित पवारांची जामखेडमध्ये भव्य मिरवणूक, 30 जेसीबीतून गुलाल उधळणार

(NCP MLA Dr Kiran Lahamate JCB Celebration Video)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.