AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातवासाठी छळल्याचा सूनेचा आरोप, आमदार विद्या चव्हाणांवर गुन्हा

दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावा विद्या चव्हाण यांच्या सूनेने केल्यानंतर संपूर्ण कुुटुंबावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे

नातवासाठी छळल्याचा सूनेचा आरोप, आमदार विद्या चव्हाणांवर गुन्हा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 03, 2020 | 12:04 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांच्या सूनेने केला आहे. (NCP MLA Vidya Chavan booked)

विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित (तक्रारदार सूनेचा पती) दुसरा मुलगा आनंद आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावाही सूनेने केला आहे.

तक्रारदार सूनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावलं. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी तक्रार सूनेने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

विद्या चव्हाणांच्या सूनेने 16 जानेवारीला विलेपार्ले पोलिस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम 498 अ, 354, 323, 504, 506 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेवरील आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्या दिंडोशी मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला.

विद्या चव्हाण अनेक चर्चांमध्ये राष्ट्रवादीची बाजू खंबीरपणे मांडतात. महिलांच्या मुद्दयावर कळकळीने बोलणाऱ्या विद्या चव्हाणांवरच सूनेच्या छळाचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. (NCP MLA Vidya Chavan booked)

हेही वाचाफेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल

Follow Us