AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशपाल भिंगेना विधानपरिषद, राष्ट्रवादीचे एकाच दगडात दोन निशाणे

राष्ट्रवादी काँग्रेसनं यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसनं एकाच दगडात वंचित बहुजन आघाडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. NCP nominate Yashpal Bhinge on Legislative council

यशपाल भिंगेना विधानपरिषद, राष्ट्रवादीचे एकाच दगडात दोन निशाणे
| Updated on: Nov 06, 2020 | 7:52 PM
Share

मुंबई: विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे. याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसनं एकाच दगडात वंचित बहुजन आघाडी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ( NCP nominate Yashpal Bhinge on Legislative council )

यशपाल भिंगे हे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. ते नांदेड मंधील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक नांदेडमधून लढवली होती. या निवडणुकीत यशपाल भिंगे यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतं मिळवली. या निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

वंचितला राष्ट्रवादीचा आणखी एक धक्का?

वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या यशपाल भिंगे यांच्या नावाची शिफारस विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी करुन राष्ट्रवादी काँग्रेसनं एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. यशपाल भिंगे यांच्या रुपात वंचितचा एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे. तर, यशपाल भिंगे यांना धनगर समाजाच्या प्रश्नांची जाण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

भाजपनं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी देत आमदार बनवले आहे. यशपाल भिंगे यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेसनही धनगर समाजाची पार्श्वभूमी असणारा नेता विधान परिषदेत पाठवला आहे. एकेकाळी वंचितमध्ये एकत्र असणारे हे दोन्ही नेते विधानपरिषेत एकमेकांच्या विरोधी बाकांवर पाहायला मिळतील.

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे (Ekanth Khadse) यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांना कला क्षेत्रातून संधी दिली आहे.

राज्यपालांना सोपवलेल्या 12 नावांची यादी

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील- 3) विजय करंजकर 4) चंद्रकांत रघुवंशी

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनगर – कला

संबंधित बातम्या :

अखेर ‘ती’ यादी राज्यपालांकडे; महाविकास आघाडीचे मंत्री राजभवनात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित

( NCP nominate Yashpal Bhinge on Legislative council )

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.