शरद पवारच 'जाणता राजा', मुंबईत राष्ट्रवादीचे पोस्टर

छत्रपती उदयनराजेंच्या काल (14 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP Poster on Sharad pawar) निशाणा साधला होता.

NCP Poster on Sharad pawar, शरद पवारच ‘जाणता राजा’, मुंबईत राष्ट्रवादीचे पोस्टर

मुंबई : छत्रपती उदयनराजेंनी काल (14 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (NCP Poster on Sharad pawar) निशाणा साधला होता. “शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. जाणता राजा म्हणून अलिकडे उपमा दिल्या जातात. मात्र जाणता राजा फक्त शिवाजी महाराज आहे”, असं उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते. त्यानंतर आज (15 जानेवारी) राष्ट्रवादीकडून घाटकोपरमध्ये शरद पवारच जाणाता राजा (NCP Poster on Sharad pawar) असल्याचे पोस्टर झळकले आहेत.

शरद पवारांना राजकारणातले जाणता राजा असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून म्हटलं जाते. त्यांचे अनेक कार्यकर्ते पोस्टरवरही जाणता राजा लिहितात. या मुद्द्यावरुन भोसलेंनी पवारांवर निशाणा साधला. “या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही”, असं उदयनराजेंनी काल सांगितले होते.

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असंही उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पवारांचे पोस्टर झळकल्यामुळे उदयनराजे यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी हे पोस्टर लावले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उदयनराजे यांनी उपस्थित केलेल्या जाणता राजा ही पदवी दिली कुणी या प्रश्नाचं उत्तर अद्याप शरद पवारांकडून आले नाही. त्यामुळे सातारा दौऱ्यावर असणारे शरद पवार हे आज उदयनराजेंच्या प्रश्नाला उत्तर देणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *