वकिलीची प्रॅक्टिस, पहिल्याच फटक्यात नगरसेवकपद ते राज्यसभेच्या हंगामी सभापती, कोण आहेत वंदना चव्हाण?

MP Vandana Chavan | वडील विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरु असताना काँग्रेसच्या नेत्यांनी वंदना चव्हाण यांना महापालिका निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे पहिल्याच फटक्यात वंदना चव्हाण नगरसेवक म्हणून निवडून आल्या.

वकिलीची प्रॅक्टिस, पहिल्याच फटक्यात नगरसेवकपद ते राज्यसभेच्या हंगामी सभापती, कोण आहेत वंदना चव्हाण?
वंदना चव्हाण, राज्यसभा खासदार

मुंबई: राज्यसभेच्या हंगामी सभापती असलेल्या वंदना चव्हाण या संसदेतील राष्ट्रवादीच्या प्रमुख खासदारांपैकी एक आहेत. राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या वंदना चव्हाण या नगसेवकपदापासून एक एक पायरी वर चढत या पदापर्यंत आल्या आहेत. गेल्यावर्षी वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या हंगामी सभापतिपदी निवड झाली होती. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यांनंतर लोकसभा किंवा राज्यसभेच्या सभेचे कामकाज चालविण्याची संधी पुण्याच्या खासदाराला वंदना चव्हाण यांच्या रूपाने मिळाली होती.

कोण आहेत वंदना चव्हाण?

वंदना चव्हाण यांचा जन्म 6 जुलै 1961 रोजी पुण्यात झाला. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. वंदना चव्हाण यांचे वडील विजयराव मोहिते हे नावाजलेले वकील होते. वंदना चव्हाण यांचे पती हेमंत चव्हाण देखील मोठे वकील आहेत. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली होती. वंदना चव्हाण या काही काळ ऑल इंडिया काऊंसिल ऑफ मेयर्सच्या वाइस चेअरपर्सन राहिल्या आहेत. त्यांनी लॉ ऑफ क्रुएल्टी, एबेटमेंट ऑफ सुसाइड और डॉवरी डेथ या पुस्तकांचे लेखनही केले आहे.

वंदना चव्हाण यांचा राजकीय प्रवास

वंदना चव्हाण या नगरसेवकपदापासून महापौर, आमदार, खासदार असा प्रवास करत संसदेत पोहोचल्या आहेत. वडील विजयराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली सुरु असताना काँग्रेसच्या नेत्यांनी वंदना चव्हाण यांना महापालिका निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. विशेष म्हणजे पहिल्याच फटक्यात वंदना चव्हाण नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर पुन्हा निवडून येऊन 1997-98 साली त्या पुण्याच्या महापौर झाल्या. सुरेश कलमाडी हे त्यांचे मार्गदर्शक होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर वंदना चव्हाण शरद पवार यांच्यासोबत काँग्रेसमधून बाहेर पडल्या. राज्यात आघाडीचे सरकार असताना वंदना चव्हाण यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यांनी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून काम केले. पुणे महापालिकेची 2012 आणि 2017 ची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी पर्वतीमधून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

स्वच्छ प्रतिमा आणि सर्व प्रकारच्या वादापासून दूर राहिलेल्या वंदना चव्हाण यांना 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले. या काळात वंदना चव्हाण यांनी संसदेत पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला. याच कामगिरीच्या जोरावर वंदना चव्हाण यांना 2018 साली राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले होते. गेल्यावर्षी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहातील कामगिरी, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर वंदना चव्हाण यांची राज्यसभेच्या हंगामी सभापतिपदासाठी निवड केली होती.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीच्या खासदाराच्या जेवणात अंड्याचं कवच, एअर इंडियाकडून केटररला दंड

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI