नाना पटोले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून कामालाही लागले? स्वबळाची भाषा

विधानसभा अध्यक्षपदाचा भार कमी करुन पटोले यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार आहे.

नाना पटोले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून कामालाही लागले? स्वबळाची भाषा
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 6:46 AM

कल्याण :  विधानसभेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या खांद्यावर पक्ष नवी जबाबदारी देणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा भार कमी करुन त्यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार आहे. तसे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. दस्तुरखुद्द नाना पटोले यांच्या बोलण्यातूनही त्यांच्या गळ्यातच अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचं दिसत आहे.  (Next Maharashtra Congress President Nana Patole?)

मुरबाडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नाना पटोलेंनी सूचक प्रतिक्रिया दिलीय. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत बदल हे चालतच राहतात. मला जर संधी मिळाली तर वेगळ्या भूमिकेत मी पुढे जाईन आणि तुमच्याकडे येईनही, असं सूचक भाष्य करताना राज्यात स्वबळावर सत्ता कशी स्थापन करता येईल, यासदंर्भात काम करीन तसंच महाराष्ट्राला पुनः वैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेस काम करणार असल्याचं पटोले म्हणाले.

येत्या काही दिवसांत काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची शक्यता आहे. त्यादृष्टीने पटोले कामालाही लागले आहेत. पटोले यांची  आक्रमक नेते म्हणून आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच आक्रमक अंदाज दिसून येतो. प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेण्याअगोदरच त्यांनी आक्रमक होत राज्यात स्वबळावर सत्ता कशी स्थापन करता येईल, यासदंर्भात काम करीन, असं म्हणत नव्या राजकीय दिशेचे संकेत दिले आहेत.

आमच्या पक्षामध्ये संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकारी  राष्ट्रीय अध्यक्षा सोनाया गांधी व राहुल गांधी यांना आहे. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाला ताकद कशी देता येईल. आणि पक्ष स्वबळावर सत्तेत कसा येईल तसंच या निमित्ताने महाराष्ट्राला पुन: वैभव प्राप्त करुन देण्याचे काम काँग्रेस पक्षातर्फे केले जाईल, असं पटोले म्हणाले.

संधी मिळाली तर वेगळ्या भूमिकेत पुढे जाईन…

गेल्या महिनाभरापासून काँग्रेसमध्ये खांदेपालटाच्या चर्चा रंगत आहेत. कल्याण सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत बदल हे चालतच राहतात. मला जर संधी मिळाली तर वेगळ्या भूमिकेत मी पुढे जाईन आणि तुमच्याकडे येईनही, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंना का प्राधान्य?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून विविध महापालिकांच्या निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे.

(Next Maharashtra Congress President Nana Patole?)

हे ही वाचा

देशाध्यक्षपद न मिळाल्यास नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात ‘फायटर’ प्रदेशाध्यक्ष द्या; विजय वडेट्टीवारांची सोनिया गांधींकडे मागणी

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.