संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ : निलेश राणे

माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Nilesh Rane slams Maha Vikas Aghadi over Minister Sanjay Rathore).

संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ : निलेश राणे
निलेश राणे, माजी खासदार
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 4:30 PM

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यांनी आज (23 फेब्रुवारी) यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जावून जगदंबामातेचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. याच मुद्द्यावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे (Nilesh Rane slams Maha Vikas Aghadi over Minister Sanjay Rathore).

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले. त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळं माफ आहे”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला (Nilesh Rane slams Maha Vikas Aghadi over Minister Sanjay Rathore).

पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

जवळपास 15 दिवसानंतर संजय राठोड आज माध्यमांसमोर आले. पोहोरादेवीगडावर सर्व समाध्यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद दहा ते बारा मिनिटे एवढीच चालली. पण पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी पूजा चव्हाणचं नाव घेऊन केली. ते म्हणाले, पूजा चव्हाण ही आमच्या गोर बंजारा समाजातील तरुणी होती आणि तिचा पुण्यात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचं आमच्या गोर बंजारा समाजाला अत्यंत दु;ख झालं आहे. चव्हाण कुटुंबाच्या दु:खात मी आणि आमचा सर्व समाज सहभागी आहे. यानंतर मात्र त्यांनी पूजाचं पुढे कुठेही नाव घेतलं नाही.

काय आहे पूजा चव्हाण-संजय राठोड-अरुण राठोड कनेक्शन?

पूजा चव्हाण ह्या तरुणीनं काही दिवसांपुर्वी पुण्यात आत्महत्या केली. ती मुळची परळीची. तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यात पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचा आवाज असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. संजय राठोड यांच्यासोबतच्या संबंधांमुळेच पूजानं आत्महत्या केल्याचा आरोपही विरोधी पक्षानं केला आहे. त्याच क्लीपमध्ये अरुण राठोडचा आवाजही असल्याचं सांगितलं जात आहे. तो पूजाचा मित्र असून संजय राठोडसाठी काम करत असल्याचं बोललं जातं आहे.

संबंधित बातम्या :

मंत्र्याला वाचवण्यासाठी मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यातील केबिनमध्ये दडलंय काय?, आशिष शेलार यांचा सवाल

संजय राठोडांनी जी भूमिका मांडली, तीच आम्हीही सांगतोय, तपास योग्य पद्धतीने : नाना पटोले

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.