AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या 139 जणांच्या निमंत्रित सदस्यांच्या यादीत नाव, निलेश राणेंची प्रतिक्रिया

निलेश राणे यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. (Nilesh Ranes reaction on BJP executive committee)

भाजपच्या 139 जणांच्या निमंत्रित सदस्यांच्या यादीत नाव, निलेश राणेंची प्रतिक्रिया
| Updated on: Jul 04, 2020 | 1:22 PM
Share

रत्नागिरी : भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर भाजपमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या 139 सदस्यांमध्ये माजी खासदार निलेश राणे यांचीही नियुक्ती झाली आहे. निलेश राणे यांची भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. (Nilesh Ranes reaction on BJP executive committee)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल भाजपची कार्यकारिणी जाहीर केली. निमंत्रित म्हणून निलेश राणेंसोबत शोभाताई फडणवीस, सुरेश हावरे, मुकुंदराव कुलकर्णी, रघुनाथ कुलकर्णी, सुधाकर देशमुख,डॉ.सुनिल देशमुख, माजी आमदार मधु चव्हाण, धनंजय महाडिक यांच्यासह 139 जणांचा समावेश आहे.

वाचा : भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोपवलेल्या या जबाबदारीवर निलेश राणेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावून, पक्ष वाढीसाठी नेहमीच प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

58 जणांची विशेष निमंत्रित सदस्य

दरम्यान, भाजपच्या कार्यकारिणीमध्ये 58 जणांची विशेष निमंत्रितांची नावं आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांच्यासह 58 जणांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र जी प्रमुख कार्यकारिणी आहे त्यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

प्रीतम मुंडेंना राज्य कार्यकारिणीत स्थान

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. महत्त्वाचं म्हणजे राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

(Nilesh Ranes reaction on BJP executive committee)

संबंधित बातम्या 

BJP Executive Committee | पंकजा मुंडेंना राज्यातील राजकारणातून वगळलं जातयं का?   

पंकजांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, ही तर केंद्राची इच्छा : चंद्रकांत पाटील 

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.