वरुण सरदेसाईंच्या सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

वरुण सरदेसाईंच्या सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 12:06 PM

मुंबई: राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray), भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. तर राज्य सरकारमधील काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sirdesai) यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray for providing security to Varun Sardesai)

“सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती”, असं ट्वीट करत नितेश राणे यांनी सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेतील बदलांवरुन टीका केली आहे.

आशिष शेलारांचंही टीकास्त्र

माजी मुख्यमंत्र्यांची तसेच कोकणाचं नेतृत्व करणारे नारायण राणे (Narayan Rane) यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेतली. हे चुकीचं आहे, असे भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलंय. तसेच, नारायण राणेंची सुरक्षा काढली, पण असं काय घडलं की शिवसेना आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा पुरवावी लागली असा सवालही शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मनावर घेतली!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

‘जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार’

“राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकताने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच- सत्तार

राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

संबंधित बातम्या:

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द; आठवलेंना एस्कॉर्टशिवाय वायप्लस सुरक्षा

Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray for providing security to Varun Sardesai

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.