AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : फिरकी बॉलवर नितेश राणेंची आक्रमक फटकेबाजी, उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला व्हिडीओ

आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी क्रिकेट उद्घाटनासाठी गेल्यानंतर क्रिकेट खेळल्याचे आपण पाहिले आहे. त्यामध्ये अनेकजणांनी लहानपणी कसे क्रिकेट खेळले असेल हे जाणवते

Video : फिरकी बॉलवर नितेश राणेंची आक्रमक फटकेबाजी, उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केला व्हिडीओ
आक्रमक फटकेबाजी करताना नितेश राणे
| Edited By: महेश घोलप | Updated on: Feb 20, 2022 | 12:31 PM
Share

मुंबई – राजकीय मैदानात आक्रमक फटकेबाजी करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी क्रिकेटच्या (cricket) मैदानात देखील आक्रमक फडकेबाजी केली असल्याचे व्हिडीओमधून (video) स्पष्ट झालं आहे. मुंबईतल्या (mumbai) काळाचौकी येथील एका मैदानाला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी हातात बॅट (bat) घेतली. बॅट घेऊन त्यांनी प्रत्येक बॉलवरती आक्रमक फटका मारला असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याचबरोबर उपस्थितांनी त्यांना त्यांच्या मोबाईलच्या कॅमे-यामध्ये देखील कैद केले आहे. नितेश राणे यांचा हा क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ अनेकांनी मोबाईलला स्टेटस देखील ठेवला आहे. नितेश राणे हे राजकीय मैदानात नेहमी आक्रमक फटकेबाजी करतात हे आपण पाहिलं आहे. परंतु त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केल्याने अनेकांचा आश्चर्य वाटले आहे. गोव्याला प्रचारासाठी गेल्यानंतर तिथंही त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तसेच तिथं भाजपाची कायम राहावी यासाठी प्रयत्न केले आहेत.

राजकारणातही आक्रमक 

नितेश राणे राजकारणात यायच्या आगोदरपासून आक्रमक असल्याचे म्हणतात. परंतु नितेश राणे जेव्हापासून राजकारणात आले, तेव्हापासून ते किती आक्रमक आहेत. हे लोकांना समजले तसेच अनेकदा विरोधी पक्षाना टोकाची भाषा वापरणे यामुळे त्याची ओळख अधिक आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग मधील शिवसेनेच्या एका नेत्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना काही दिवस पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. तिथं त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जमीन मंजूर केला. दोन दिवसात नितेश राणे भाजपच्या प्रचारासाठी गोव्यात गेल्यानंतर त्यांच्यावरती विरोधकांनी टीका केली.

क्रिकेटमधला आक्रमकपणा व्हिडीओमध्ये कैद 

आत्तापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी क्रिकेट उद्घाटनासाठी गेल्यानंतर क्रिकेट खेळल्याचे आपण पाहिले आहे. त्यामध्ये अनेकजणांनी लहानपणी कसे क्रिकेट खेळले असेल हे जाणवते यामध्ये भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचे क्रिकेट खेळल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत .परंतु अनेक राजकीय नेत्यांनी  आत्तापर्यंत अनेकदा क्रिकेट खेळले आहे. नितेश राणे यांचा मुंबईतील काळाचौकी परिसरातील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच त्यांचं तिथल्या लोकांनी जंगी स्वागत देखील केल आहे. तिथल्या लोकांनी फुलांची उधळण करीत त्यांचं स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय.

Video: …असे चुX#@ देशात भरपूर,पत्रकारांनी सोमय्यांबद्दल विचारताच संजय राऊत भडकले, पाहा काय म्हणाले?

गुलाबरावांनी ‘डाकू’ म्हणताच नाथाभाऊंनी ‘चोर’ म्हणत काढले उट्टे; शिवसेना-राष्ट्रवादीत शिव्यांची लाखोली

मानव-वन्यप्राण्यांचा संघर्ष, तीन वर्षांत 211 जणांचा प्राण्यांनी घेतला बळी, एकवीस हजारांच्या वर प्राण्यांनाही गमवावा लागला जीव

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा