आम्ही धोक्याने सत्तेबाहेर, आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही : देवेंद्र फडणवीस

आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, मात्र आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Indapur) यांनी व्यक्त केला.

आम्ही धोक्याने सत्तेबाहेर, आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही : देवेंद्र फडणवीस


इंदापूर (पुणे) : आम्ही धोक्याने सत्तेपासून बाहेर राहिलो, मात्र आम्हाला फार काळ कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Indapur) यांनी व्यक्त केला. ते इंदापूरमध्ये बोलत होते.

हर्षवर्धन पाटील आणि माझादेखील ॲक्सिडेंट (अपघाताने पराभव) झाला आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही, फार काळ कोणी आपल्याला मागे ठेऊ शकत नाही. असा आत्माविश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये व्यक्त केला. (Devendra Fadnavis Indapur)

ज्यांच्यासोबत होतो त्यांनी जनादेशाचा विश्वासघात केला. 70 टक्के जागा आम्ही जिंकूनही 40 टक्के मिळवणारे एकत्र येऊन मेरीटमध्ये आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. पण ही सत्ता फार काळ चालणार नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

इंदापूर येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, राम सातपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI