ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार, भुजबळांची प्रतिक्रिया, मु्ख्यमंत्री आणि शरद पवार प्रयत्नशील

ओबीसी आरक्षणप्रश्नी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. रॅन्डम सॅम्पलिंग संदर्भात मतभेदांवर चर्चा व्हावी. एकत्रितपणे बसून चर्चा करणं गरजेचं असल्याचंही भुजबळ म्हणाले.

ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार, भुजबळांची प्रतिक्रिया, मु्ख्यमंत्री आणि शरद पवार प्रयत्नशील
छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री


नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी कुणाच्याही पाया पडायला तयार असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षण टिकलं पाहिजे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही भुजबळ म्हणाले. ओबीसी आरक्षणप्रश्नी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. रॅन्डम सॅम्पलिंग संदर्भात मतभेदांवर चर्चा व्हावी. एकत्रितपणे बसून चर्चा करणं गरजेचं असल्याचंही भुजबळ म्हणाले. दरम्यान, भुजबळ यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. (Chagan Bhujbal’s appeal to all political parties to come together for OBC reservation)

राजकारण आपल्या स्थानी, मात्र ओबीसी आरक्षणाबाबत सर्वांनी एकत्र या. ओबीसी आरक्षणासंदर्भात तोडगा निघणं महत्वाचं आहे. त्यासाठी सामुहिक नेतृत्व करु, असं आवाहनही भुजबळ यांनी सर्व विरोधकांना केलंय. येत्या 2 ते 3 दिवसांत इम्पेरिकल डाटासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही यावेळी भुजबळांनी सांगितलं. त्याचबरोबर बारामती नेहमीच तुमच्याबरोबर राहिली आहे. बारामतीनेच आरक्षण दिलंय. व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यावर महाराष्ट्राने पहिल्यांदा तो स्वीकारला. प्रत्येक वेळी बारामती बारामती करु नका, बरोबर असताना वितुष्ठ वाढवायचं नाही, असा इशाराही भुजबळ यांनी दिलाय.

भुजबळ आणि फडणवीस भेट

“राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, इम्पिरिकल डाटाबाबत केंद्राकडे पाठपुराव करण्यासाठी चर्चा केली.

ओबीसी राजकीय आरक्षण संबंधी छगन भुजबळ यांनी आज सकाळी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मी या प्रश्नात संपूर्ण मदत करेन, असे सांगितले. आम्ही मराठा आरक्षणावेळी राज्यात एम्पिरिकल डाटा गोळा केला होता. तो सुप्रीम कोर्टानेही मान्य केला. त्यामुळे एम्पिरिकल डाटा कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील आम्ही चर्चा केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

OBC reservation : भुजबळसाहेब पुढाकार घ्या, मी पर्सनली नोट तयार करुन देतो : देवेंद्र फडणवीस

आधी म्हणाले ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करा, आता छगन भुजबळ थेट फडणवीसांच्या भेटीला

Chagan Bhujbal’s appeal to all political parties to come together for OBC reservation

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI