हिंसाचारानंतरही पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 72 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 17 जागांसाठी मतदान झालं. तर उत्तर प्रदेशमध्ये 13, राजस्थानमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 8, मध्य प्रदेशात 6, ओदिशात 6, बिहारमध्ये 5, झारखंडमध्ये 3 आणि जम्मू-काश्मिरच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात …

West Bengal is highest in voting, हिंसाचारानंतरही पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 72 लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजेच 17 जागांसाठी मतदान झालं. तर उत्तर प्रदेशमध्ये 13, राजस्थानमध्ये 13, पश्चिम बंगालमध्ये 8, मध्य प्रदेशात 6, ओदिशात 6, बिहारमध्ये 5, झारखंडमध्ये 3 आणि जम्मू-काश्मिरच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, चौथ्या टप्प्यात एकूण 64 टक्के मतदान झालं. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 76.44 टक्के मतदान झालं.

लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये 54.16 टक्के, राजस्थानमध्ये 64.87 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 76.44 टक्के, मध्य प्रदेशात 66.14 टक्के, ओदिशात 64.05 टक्के, बिहारमध्ये 57.95 टक्के, झारखंडमध्ये 63.77 टक्के आणि जम्मू-काश्मिरमध्ये 9.79 टक्के मतदान पार पडलं.

पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मतदान

चौथ्या टप्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 76.44 टक्के मतदान पार पडलं. मात्र, पश्चिम बंगालमध्ये यावेळी दहशतीचं वातावरण बघायला मिळालं. मतदान सुरु झाल्याच्या काहीच तासात पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. बीरभूर येथील नानूर, रामपूरहाट नलहाटी आणि सिउरी या क्षेत्रांत विरोधी पक्षांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. तर दुहराजपूर क्षेत्रात मतदारांना आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये हाणामारी झाली. एका मतदान केंद्राबाहेर टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवार बाबूल सुप्रियो यांच्या वाहनाची तोडफोड केली. दुसरीकडे, काही समाजकंटकांनी धमकावल्यामुळे मतदान केंद्रातील मतदाता केंद्र सोडून पळून गेल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालच्या आसनसोल येथे मतदानाचा दिवस हा वादाचा दिवस ठरला. आसनसोलच्या जेमुआ मतदान केंद्र क्रमांक 222 आणि 226 वर ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या अनुपस्थितीत मतदानावर बहिष्कार टाकला. तर मतदान केंद्र क्रमांक 199 वर टीएमसी कार्यकर्ता आणि सुरक्षा दल यांच्यात वाद झाला.

निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री आणि आसनसोल येथून  भाजपचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर मतदान केंद्रात जबरदस्ती घुसून तिथल्या टीएमसीचे कार्यकर्ते आणि उपस्थित अधिकाऱ्यांशी चुकीची वागणूक केल्याचा आरोप आहे.

मुंबईत आज 6 लोकसभेच्या जागांसाठी मतदान पार पडलं. यावेळी मुंबईकरांमध्ये मतदानासाठीची जागरुकता आणि उत्सुकता बघायला मिळाली. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यावेळी मुंबईत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50 टक्क्यांच्यावर मतदान झालं.  मतदानासाठी मुंबईत नेते अभिनेत्यांसह सेलिब्रिटींनीही मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेते शाहरुख, बच्चन कुटुंबीय, गीतकार गुलजार, रणबीर कपूर, करिना कपूर, रणवीर सिंह, ऋतिक रोशन, सलमान खान, प्रियांका चोप्रा, मुकेश अंबानी, नीता अंबानी, नरेश गोयल, जावेद अख्तर, आमिर खान यांसारख्या दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *