Election | उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा, भाजप शिवसेना नेते आमने सामने

Election | उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीची घोषणा, भाजप शिवसेना नेते आमने सामने
उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणूक

उस्मानाबाद (Osmanabad Bank Election) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या 15 संचालक मंडळाच्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान होणार आहे.

संतोष जाधव

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 18, 2022 | 11:38 AM

उस्मानाबाद : राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. आता आणखी एका जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उस्मानाबाद (Osmanabad Bank Election) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या 15 संचालक मंडळाच्या जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान होणार आहे. 20 फेब्रुवारीला मतदान तर 21 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाख करण्याची प्रक्रिया आजापासून सुरु होत आहे. जिल्हा बँकेच्या (DCC Bank Election) संचालक मंडळाचा कार्यकाळ मे 2020 मध्ये संपला होता. मात्र, कोरोना विषाणू संसर्ग (Corona) आणि इतर कारणांमुळं जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. उस्मानाबाद जिल्हा बँकेत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. राणा जगतिसंह पाटील यांना शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून आव्हान दिलं जाऊ शकते.

24 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत

18 जानेवारी ते 24 जानेवारी या काळात सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. 25 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. 27 जानेवारी रोजी दाखल उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप व उमेदवार यांची अंतिम यादी प्रसिद्ध करता येणार आहे.

20 फेब्रुवारीला मतदान 21 ला निकाल

20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत विविध मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे तर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतदान केंद्राची यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

जिल्हा बँक संचालक मंडळाची रचना कशी?

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 15 संचालक मंडळाची निवडणुक होणार आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था मतदार संघात 8 संचालक असणार आहेत. उस्मानाबाद,तुळजापूर,भूम,परांडा,उमरगा,लोहारा,कळंब व वाशी या 8 तालुक्यातून प्रत्येकी 1 जागा असणार आहे. 2 जागा या महिला प्रतिनिधी, अनुसूचित जाती व जमाती 1 , इतर मागास प्रवर्ग 1, भटक्या विमुक्त जाती व मागास प्रवर्ग 1, इतर शेती संस्था 1 व नागरी बँका आणी इतर संस्था गटातून 1 असे एकूण 15 संचालक मंडळाच्या जागासाठी मतदान होणार आहे.

इतर बातम्या:

Nitish Bharadwaj Separated From Wife: महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट, मृत्यूही घटले

 

Osmanabad District Bank Election Programme Declare Shivsena and BJP will contest for Bank

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें