AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत धनंजय मुंडेंचं आव्हान, पंकजा मुंडे म्हणतात….

ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीने जाणून घेतली.

परळीत धनंजय मुंडेंचं आव्हान, पंकजा मुंडे म्हणतात....
| Updated on: Sep 19, 2019 | 12:34 PM
Share

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बीड (Beed) जिल्ह्यातील 5 उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) जाहीर केले आहेत. परळी विधानसभा मतदारसंघात (Parali Constituency) राष्ट्रवादीने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मैदानात उतरवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री आणि परळीच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीने जाणून घेतली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “परळीत आव्हान माझ्यासाठी नाही तर, त्यांच्यासाठी आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वात आधी बीडच्या जागांची घोषणा केली आहे. आहेत ती माणसं सोडून जाऊ नये म्हणून एकप्रकारे त्यांना उमेदवारी देऊन अडकवून ठेवलं आहे” बीडमध्ये रंगतदार लढती

परळीच्या मैदानात 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी (Beed Vidhansabha Big Fight) झालेल्या रंगतदार सामन्याची पुनरावृत्ती यंदाही घडणार आहे. कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडांमध्ये यावेळीही लढत होणार आहे. पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगताना दिसतं. आता निवडणुकीच्या प्रचारात ते शिगेला पोहचताना दिसेल.

बीडमधून शरद पवारांनी राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले संदीप यांचे काका आणि मंत्री जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे बीडच्या पीचवर काका-पुतणे आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय. ही निवडणूक माझ्या जीवन-मरणाची आहे, मी गेल्या 24 वर्षात केलेल्या सेवेचं फळ मला द्या, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आपल्याला विजयी करण्याचं भावनिक आवाहन केलं होतं.

बीडमधील संभाव्य रंगतदार लढती

• बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) VS संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी) • परळी – पंकजा मुंडे (भाजप) VS धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) • गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) VS विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी) • माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) VS प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी) • केज – संगिता ठोंबरे (भाजप) VS नमिता मुंदडा (राष्ट्रवादी) • आष्टी – भीमराव धोंडे (भाजप) VS अद्याप उमेदवार ठरलेला नाही

2014 मध्ये निवडून आलेले विद्यमान आमदार

गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप) माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप ) बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना) आष्टी – भीमराव धोंडे (भाजप) केज – संगिता ठोंबरे (भाजप) परळी – पंकजा मुंडे (भाजप)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.