पदासाठी हाथ फैलावण्याचे संस्कार रक्तात नाहीत, पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा समोर

एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असे रोखठोक वक्तव्य भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या बुलडाण्यात बोलत होत्या.

पदासाठी हाथ फैलावण्याचे संस्कार रक्तात नाहीत, पंकजा मुंडेंची खदखद पुन्हा समोर
PANKAJA MUNDE
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 12:24 AM

बुलडाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असे रोखठोक वक्तव्य भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्या बुलडाण्यात बोलत होत्या. या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे यांची आपली खदखद पुन्हा एकदा जाहीरपणे बोलून दाखवल्याचं म्हटलं जात आहे.

कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत

बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना मुंडे यांची खदखद पुन्हा समोर आल्याचं पाहायला मिळालं. पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट केलं. “माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्ररिक्रमाची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत,” असं थेट भाष्य पंकजा मुंडे यांनी केलं.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी मुंडे भगिनी नाराज, राज्यात खळबळ

पंकजा मुंडे आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलेलं आहे. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनींची ही खदखद प्रकर्षाने समोर आली होती. त्यावेळी राज्यात मोठं अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं होतं. राज्यभारातून मुंडे भगिनी समर्थकांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर पंकजा यांनी दिल्लीला वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दिल्लीतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतरच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, यावेळीसुद्धा पंकजा यांनी कोणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्यात नाहीत, असं वक्तव्य केलंय. या वक्तव्यानंतर आता भाजपच्या इतर नेत्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.