प्रवीण घुगेंची बंडखोरी नाही, पक्षाच्या आदेशानेच अर्ज, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण

पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले प्रवीण घुगे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून अर्ज माघारी घेण्याचे संकेत मिळत आहेत.

प्रवीण घुगेंची बंडखोरी नाही, पक्षाच्या आदेशानेच अर्ज, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 5:59 PM

औरंगाबाद : प्रवीण घुगे (Pravin Ghuge) यांनी भाजपच्या आदेशानेच अर्ज भरला होता, एखाद्या वेळेस अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर  (Shirish Boralkar) यांचा अर्ज बाद झाला, तर उमेदवार असावा म्हणून अर्ज भरला आहे, असं स्पष्टीकरण भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिलं. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले प्रवीण घुगे अर्ज माघारी घेण्याचे संकेत मिळत आहेत. (Pankaja Munde on Aurangabad Graduate Constituency Election rebel candidate Pravin Ghuge)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात होतं.

“तिकीट देण्यावरुन मतं व्यक्त केली, आणि मत आम्ही कानात बोलत नाही, जाहीर बोलतो, प्रवीण घुगे यांनी पक्षाच्या आदेशाने अर्ज भरला होता, एखाद्या वेळेस अर्ज बाद झाला तर उमेदवार असावा म्हणून भरला आहे” असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचं बोललं जातं. आता कोण-कोण बंडाचे निशाण खाली ठेवणार, याकडे लक्ष आहे.

“एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहे. त्यामुळे मी पूर्ण काम करेन” अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली.

“भाजप माझ्या बापाचा पक्ष”

”भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. (Pankaja Munde on Aurangabad Graduate Constituency Election rebel candidate Pravin Ghuge)

रावसाहेब दानवे खासदार प्रीतम मुंडे यांचा फॉर्म भरायला आले आणि प्रीतमताईंचा विजय झाला, पण आमदारकीवेळी माझा फॉर्म भरायला आले नाहीत, मी पराभूत झाले” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची खुशामत केली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

सर्वच जवळचे कार्यकर्ते, बळ लावण्यासाठी औरंगाबादेत, बोराळकरांचा अर्ज भरताना पंकजांची प्रतिक्रिया

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

(Pankaja Munde on Aurangabad Graduate Constituency Election rebel candidate Pravin Ghuge)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.