AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील सर्वाधिक संपत्तीचा उमेदवार, मेहतांच्या समर्थकांनी गाडी फोडलेल्या पराग शाहांची संपत्ती किती?

भाजपने घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहता (Prakash Mehta BJP) यांचं तिकीट कापून नगरसेवक पराग शाह (Parag Shah BJP) यांना उमेदवारी दिली आहे.

देशातील सर्वाधिक संपत्तीचा उमेदवार, मेहतांच्या समर्थकांनी गाडी फोडलेल्या पराग शाहांची संपत्ती किती?
| Updated on: Oct 04, 2019 | 12:30 PM
Share

Parag Shah BJP मुंबई : उमेदवार याद्यांनंतर भाजपमधीलअंतर्गत गटबाजी समोर आली आहे. भाजपने घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहता (Prakash Mehta BJP) यांचं तिकीट कापून नगरसेवक पराग शाह (Parag Shah BJP) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र संतप्त झालेल्या मेहतांच्या कार्यकर्त्यांनी पराग शाह (Parag Shah BJP) यांच्या गाडीची तोडफोड केली.

पराग शाह हे नाव दोन वर्षापूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान देशभरात चर्चित होतं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक संपत्तीचा उमेदवार म्हणून पराग शाह यांचं नाव समोर आलं होतं. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराग शाह यांनी आपली संपत्ती 690 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं.

पहिलीच निवडणूक

पराग शाह हे दोन वर्षापूर्वी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. ती त्यांची पहिलीच निवडणूक होती.  49 वर्षीय पराग शाह हे राजकीय कारकिर्दीमुळे नव्हे तर त्यांच्या संपत्तीमुळे देशभर चर्चेत होते. पराग शाह यांचा व्यवसाय मुंबईसह गुजरात आणि चेन्नईपर्यंत पसरला आहे.

महत्त्वाचं म्हणजे पराग शाह हे प्रकाश मेहतांचे निकटवर्तीय मानले जातात. घाटकोपर हा गुजरातीबहुल परिसर असल्याने प्रकाश मेहता आणि पराग शाह या जोडगोळीचं इथे वर्चस्व पाहायला मिळतं.

कोणतंही कर्ज नाही

पराग शाह यांनी अमाप संपत्ती असताना, दुसरीकडे त्यांच्यावर कवडीचंही कर्ज नसल्याचं त्यांनी दोन वर्षापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. आता पराग शाह यांच्या नव्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीत नेमके काय बदल झालेत हे पाहावं लागेल.

गाडी फोडली

प्रकाश मेहता यांच्या जागी भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड (Parag Shah Car Destroyed) करण्यात आली आहे. प्रकाश मेहतांना तिकीट नाकारल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांना पराग शाहांची गाडी फोडली. मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहतांचा पत्ता कट करत पराग शाहांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळाला.

कोण आहेत पराग शाह?

  • पराग शाह हे मुंबईतील बडे उद्योजक आहेत. त्यांना भाजपने घाटकोपर पूर्वमधून विधानसभेची उमेदवारी दिली आहे
  • पराग शाह हे नाव दोन वर्षापूर्वी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी चर्चेत आलं होतं.
  • भाजपने घाटकोपरमधूनच त्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती.
  • देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून पराग शाह चर्चेत आले होते.
  • पराग शाह यांनी 2017 मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची संपत्ती तब्बल 689 कोटी रुपये इतकी होती.
  • इतक्या मोठ्या संपत्तीचा उमेदवार लोकसभा-विधानसभेला नव्हे तर महापालिकेच्या निवडणुकीत उतरला होता.
  • त्यामुळेच देशाचं लक्ष घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 कडे लागलं होतं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.