Parliament Monsoon Session : ‘ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला त्याच पाळतखोर मंडळींचं आकांडतांडव’, भाजपचा पलटवार

विरोधकांच्या या आरोपाला भाजप नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्ला चढवलाय.

Parliament Monsoon Session : 'ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला त्याच पाळतखोर मंडळींचं आकांडतांडव', भाजपचा पलटवार
केशव उपाध्य, मुख्य प्रवक्ते, भाजप

मुंबई : संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी हेरगिरीच्या प्रकरणांवर जोरदार गोंधळ घातला. एक दोन नाही तर तब्बल 300 भारतीयांची हेरगिरी केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप काल जात आहे. ‘द वायर’ (The Wire) ह्या न्यूज पोर्टलनं याची बातमी दिलेली आहे. विरोधकांच्या या आरोपाला भाजप नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेसवर हल्ला चढवलाय. (BJP spokesperson Keshav Upadhyay responds to Congress spying allegations via Twitter)

‘9 हजार फोन आणि ५०० इमेल खाती यांवर काँग्रेसचे नेत्तृत्व असलेल्या #UPA मध्ये पाळत ठेवली जात होती. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्या कार्यालयात नजर ठेवण्यातआली ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करीत आहेत’, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केलीय.

काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे. इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर Pegasusचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.

केंद्र सरकारचं म्हणणं काय?

केंद्राकडून लोकांवर अशा पद्धतीने लक्ष ठेवण्यात येत असल्याचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळून लावलं आहे. याबाबतचा कोणताही ठोस पुरावा किंवा आधार नाही. भारताची लोकशाही लवचिक आहे. देशातील नागरिकांचा गोपनियतेचा अधिकार हा मौलिक अधिकार म्हणून त्याचं सरकारडून संरक्षण केलं जात आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.

पेगासस काम कसं करतं?

ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं.

संबंधित बातम्या :

Parliament Monsoon Session: विरोधी पक्षांची मानसिकता दलित, आदिवासी, ओबीसी आणि महिलाविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

Parliament Monsoon Session: तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला

BJP spokesperson Keshav Upadhyay responds to Congress spying allegations via Twitter

Published On - 4:07 pm, Mon, 19 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI