आपुनीच भगवान है… धनंजय मुंडे भरसभेत असं काही बोलून गेले की… नेमकं विधान काय?
Dhananjay Munde Speech : परळी नगर परिषदेच्या प्रचारा दरम्यान धनंजय मुंडेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सगळीकडे होत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.

राज्यातील नगर पंचयत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रमुख राजकीय नेते प्रचारात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हेही पायाला भिंगरी लावून प्रचारसभा घेत आहेत. अशातच आता परळी नगर परिषदेच्या प्रचारा दरम्यान धनंजय मुंडेंनी केलेल्या एका विधानाची चर्चा सगळीकडे होत आहे. एका प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी परळीत अडचणीत असताना लोकांना देवाच्या आधी धनंजय मुंडे आठवतो असं विधान केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
एका प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी परळी पासून फाटक तुटू देत नसतो. रेल्वेसाठी पैसे मागितलेलं आहेत. रेल्वेची जागा हस्तांतरित होणार आहे. एका माहिन्याच्या आत घरकुल मंजूर करून देतो. म्हाडामधून सर्व्हे करून 1700 घरकुल आपण करणार आहोत. सिमेंट क्राँकीटचा रस्ता आपण पूर्ण केला. 65 कोटी रूपायाचं क्रिडा संकुल विद्यावर्धीनीची करणार आहोत.
लोकांना देवाच्या आधी मी आठवतो
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाल्या की, परळी विधानसभेत मला एवढी मत दिली की मशीनला मोजायला कंटाळा आला. तुम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम दिलेलं आहे ते विसरू शकतं नाही. एखाद्याला व्यक्तीला अडचण आली की देवांच्या आधी धनंजय मुंडेचा नंबर आठवतो. तो मला फोन करतो आणि त्याची अडचण सांगतो. मी नशीबवान आहे. माझं संबंध जीवन आपल्या सेवेत जाणार आहे.
परळी शहराचे नाव उंच करणार
आपल्या भाषणात पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, मला वाटतं निवडणुकीत सुरवातीलाच विजय दिसतोय. काल जे चांगलं म्हणत होते ते आज चुकीच बोलत आहेत. मागील एका वर्षात निवडणुकीनंतर मंत्री बनलो आणि सोडले. मला त्याच दुःख, त्याचा अफेसोस नाही. परळीला बदमान करणाऱ्याला मतामधून दाखवून द्या. माझ्या जागेवर दुसरा असतात तर टिकला नसता. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मुळे. परळीचे नाव देशात उंच करेल. परळी शहरातील रस्ते चांगले झाले. जाती पाती धर्माचे राजकारण बीड मध्ये चालत नाही. चांगले काम करणार्यांना सहकार्य करा. परळी शहराचे नाव पुन्हा देशात बुलंद करेल, लोक म्हणतील पुन्हा देशात नाव उंच केले.
