AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणी राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 09, 2019 | 11:09 AM
Share

बीड : विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणी राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी बरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगतीचे आदेश दिले होते. मात्र आता नव्या याचिकेमुळे धनंजय मुंडेंवर टांगती तलवार आहे. आता 15 तारखेच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल?

धनंजय मुंडे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करा, असे आदेश दिल्यानंतर अखेर 14 जून रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. बेलखंडी मठाची जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर हा गुन्हा दाखल झाला. यात कलम 420, 468, 465, 464, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण 14 आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला. यात धनंजय मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी होते. धनंजय मुंडे यांच्यासह पत्नी राजश्री मुंडे, बहीण प्रेमा केंद्रे, खंदेसमर्थक सूर्यभान नाना आणि वाल्मिक कराड यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यापूर्वी सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

दरम्यान  मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसात सुप्रीम कोर्टाने धनंजय मुंडेंना दिलासा दिला होता.  औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणली. शिवाय, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नोटीस बजावून याप्रकरणी उत्तर मागितले.

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील पूस या गावात जगमित्र सहकारी साखर कारखाना प्रस्तावित होता. हा साखर कारखाना सुरु करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी 2006 ते 2010 या कालावधीत शेकडो एकर जमीन विकत घेतली त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून तब्बल 25 कोटी रुपयांचं भागभांडवालही उभं केलं. मात्र कारखाना काही सुरु झाला नाही.

या प्रक्रियेत धनंजय मुंडे यांनी पूस या गावात असलेल्या बेलखंडी मठाची 25 एकर जमीनही विकत घेतली. ही जमीन बेलखंडी मठाला इनाम दिलेली. जमीन होती आणि त्याचा विक्री व्यवहार होऊ शकत नव्हता याची माहिती असतानाही बेकायदेशीर पद्धतीने ही जमीन विकत घेण्यात आली आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडले.

पुढे जगमित्र साखर कारखान्याची मान्यता नाकारण्यात आली आणि हा कारखाना सुरु होण्याआधीच बंद पडला. पण त्यानंतरही कारखान्याने जमीन परत केली नाही. तेव्हापासून राजाभाऊ फड हे सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढत आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी त्यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले होते.

संबंधित बातम्या 

स्पेशल रिपोर्ट : धनंजय मुंडेंना सुप्रीम कोर्टाकडून खरंच दिलासा मिळालाय का?   

आरोपी क्रमांक 10… धनंजय मुंडेंविरोधात ‘420’चा गुन्हा दाखल  

जमिनींचं खरेदीखत गुन्हा असतो, कारस्थान नाही, धनंजय मुंडेंना धस यांचं उत्तर 

धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन  

Follow Us
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात
मराठा आरक्षणावर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
Sudhir Mungantiwar | मराठा आरक्षणावर सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा; खासदारांना काय केलं आवाहन?
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं