प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही; पण भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार: नवाब मलिक

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही; पण भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार: नवाब मलिक
sharad pawar

मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी साडेतीन तास चर्चा केली. त्यामुळे या भेटीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. (prashant kishor will not campaign to ncp, says nawab malik)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं मलिक यांनी सांगितलं.

सशक्त आघाडी निर्माण करणार

देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची पवारांची इच्छा आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु, ते देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

मलिक यांच्या खुलाश्याचा अर्थ काय?

मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधी आघाडी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत याच मुद्दयावर चर्चा झाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही आघाडी कशी निर्माण करता येईल. त्यात कोणते पक्ष येऊ शकतात, भाजविरोधी भूमिका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या इतर पक्षाच्या नेत्यांना कसे जवळ आणता येईल, यावरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. तसेच बसपा नेत्या मायावती, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅनली आणि सपा नेते अखिलेश यादव हे या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्या मुद्द्यावर आघाडीत आणता येईल, याचीही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (prashant kishor will not campaign to ncp, says nawab malik)

 

संबंधित बातम्या:

Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!

लोकसभेच्या 400 जागांवर भाजपला मात कशी देता येऊ शकते?; प्रशांत किशोर यांनी सांगितलं पवारांना टॉप सिक्रेट!

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

(prashant kishor will not campaign to ncp, says nawab malik)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI