प्रवीण चव्हाण यांच्या जीविताला धोका? चंद्रकांतदादांकडून केंद्राच्या संरक्षणाची मागणी!

देवेंद्र फडणवीसांनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बवरुन आरोपांच्या केंद्रस्थानी आलेले विशेष सरकारी वकील यांच्या जीवाला धोका असल्याची भीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय. तर मागील तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षाकडे होते. मग ते गप्प का बसले? असा सवाल प्रविण चव्हाण यांनी केलाय.

प्रवीण चव्हाण यांच्या जीविताला धोका? चंद्रकांतदादांकडून केंद्राच्या संरक्षणाची मागणी!
चंद्रकांत पाटील, प्रवीण चव्हाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 8:41 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत एक व्हिडीओ बॉम्ब (Video Bomb) टाकून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच पोलीस बदली घोटाळा प्रकरणात आज देवेंद्र फडणवीस यांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला आहे. अशावेळी फडणवीसांनी टाकलेल्या व्हिडीओ बॉम्बवरुन आरोपांच्या केंद्रस्थानी आलेले विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्या जीवाला धोका असल्याची भीती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलीय. तर मागील तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षाकडे होते. मग ते गप्प का बसले? असा सवाल प्रविण चव्हाण यांनी केलाय.

चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण चव्हाण यांच्या जीविताला धोका असल्याची भीती व्यक्त करत त्यांना केंद्राच्या संरक्षणाची देण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र पोलिसांचं संरक्षण त्यांना नको. कारण, महाराष्ट्र पोलीस त्यांना मारुन टाकतील. अंबानींच्या घराबाहेर जे जिलेटीन ठेवलं होतं. त्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सांगत होते की पोलीस संरक्षण द्या. तिथे घात झाला तसा प्रवीण चव्हाणांचाही होण्याची शक्यता आहे. त्यांना केंद्राचं पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी पाटील यांनी केलीय.

प्रवीण चव्हाण यांचा भाजपला सवाल

दरम्यान, प्रवीण चव्हाण यांनी जळगावमधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या तेजस मोरेनं स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप केलाय. तेजस मोरे पाठोपाठ चौकशीनंतर अजून काही नावं पुढे येणार आहेत. तीन महिन्यांपासून रेकॉर्डिंग विरोधी पक्षांकडे होते. मग ते गप्प का होते? कारण, त्यांना व्हिडीओ एडिट करण्यासाठी वेळ हवा होता, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर चौकशीनंतर सर्व गोष्टी पुढे येतील, थोडा वेळ द्या. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री किंवा सरकारकडून माझ्याशी काही बोलणं झालं नाही. या प्रकरणात एक माजी पत्रकार आणि एक कॉन्स्टेबलही सहभागी आहे. लवकरच त्यांची नावं समोर येतील, असा दावाही चव्हाण यांनी केलाय. माझा सरकारशी आणि कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नसल्याचंही चव्हाण यावेळी म्हणाले.

तेजस मोरेसोबत टीव्ही 9 मराठीचा संवाद

प्रश्न: नमस्कार, प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयात डिजीटल घड्याळ तुम्ही बसवलं आणि त्यातून शुटींग करण्यात आलं?

तेजस मोरेंचं : हा जो त्यांनी माझ्यावर करण्यात आलेला आरोप बेसलेस आहे. अतिशय खोटा आरोप आहे. त्या स्टिंग ऑपरेशनशी माझा काडीचा संबंध नाही. कोणताही पुरावा सादर न करता बेछूट आरोप केलाय,

प्रश्न: प्रविण चव्हाण यांना कधीपासून ओळखता, कोणत्या कामासाठी भेटलेला

तेजस मोरे: प्रविण चव्हाण यांना मी जुलै 2021 मध्ये भेटलो होतो. एका खोट्या गुन्ह्यात अडकवल्यानंतर माझा त्यांनी जामीन करुन दिला. त्यानंतर माझं आणि त्यांचं ट्युनिंग जमलं होतं. मी त्यांच्याकडे जात असे. ते म्हणायचे की माझं इंग्रजी चांगलं नसल्यानं तुम्ही मला ड्राफ्टिंग करु द्या, असं ते म्हणायचे. मी ड्राफ्टिंग करायचो. मी गिरीश महाजन आणि बीएचआर प्रकरणात ड्राफ्टिंग केलं आहे. माझं कायद्याचं नॉलेज जास्त नसल्यानं मला जबाब नोंदवणे हे सरकारी वकिलाचं काम नसतं हे माहिती नव्हतं.

प्रश्न : तुमचं शिक्षण काय झालंय?

तेजस मोरे: मी बांधकाम व्यवसायिक होतो. आता मला जामीन झाल्यानंतर नवीन व्यवसायाच्या शोधात होतो. प्रविण चव्हाण यांच्या ऑफिसला जात होतो. गिरीश महाजन यांच्या केसमधील फिर्यादी आणि प्रविण चव्हाण यांच्यातील दुवा म्हणून मी काम केलं. सरकारी वकील आणि फिर्यादी बोलू शकत नसल्यानं चव्हाण मला मेसेज पाठवायचे आणि मी ते फिर्यादीला पाठवायचो, असं तेसज मोरे म्हणाले.

प्रश्न: गिरीश महाजन प्रकरणातील फिर्यादीला तुम्ही ओळखता का?

तेजस मोरे: गिरीश महाजन प्रकरणातील फिर्यादीला मी ओळखतो, ते आमच्या परिचयातील आहेत, असं तेजस मोरे म्हणाले.या शिवाय प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन मी केलं नसल्याचं देखील मोरे नी स्पष्ट केलं.

इतर बातम्या :

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या’, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची मागणी!

CWC Meeting : ‘देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू’, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.