AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नानांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली, आघाडीत विसंवाद; दरेकरांचा घणाघात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. (pravin darekar)

नानांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली, आघाडीत विसंवाद; दरेकरांचा घणाघात
pravin darekar
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 1:47 PM
Share

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आघाडीत विसंवाद असून मविआ सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (pravin darekar attacks maha vikas aghadi over nana patole statement)

प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आघाडी तोडायला कोणीही गेलं नाही. तेच एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे एकत्र असल्याचा कांगावाही करत आहेत. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? केंद्राने यांना मदत केली. यांना आपआपसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत, असं दरेकर म्हणाले.

पंकजा मुंडेंचं दबावतंत्र नाही

प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजाताईंकडून कोणतंही दबावतंत्र वापरलं जात नाही. पंकजाताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या नाराज नाहीत. काल राष्ट्रीय सचिवांची बैठक होती. त्यासाठी त्या दिल्लीत गेल्या होत्या, असं दरेकर म्हणाले. आपल्या नेत्याला पद मिळावं असं कार्यकर्त्यांना वाटत असतं. ते स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांना समजावतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोदी मनधरणी करणार नाहीत

पंकजा मुंडे यांची पंतप्रधान मनधरणी करणार नाहीत. ते मोठे नेते आहेत, असं सांगतानाच शशिकांत शिंदे यांना आगीत तेल ओतण्याखेरीज दुसरं काम नाही. भाजपने कुणाला मंत्रिपद द्यावं याची काळजी शशिकांत शिंदे यांनी करू नये. नाना पटोले काय बोलतात ते आधी पाहावे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊतांचा एकच अजेंडा

यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवरही प्रतिक्रिया दिली. तथ्य असेल तर ईडी कारवाई करत असते. संजय राऊत यांना एकच काम आहे. रोज केंद्र सरकारवर रोज टीका करायची हाच राऊत यांचा अजेंडा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

लस घेतल्यांना प्रवासाची मुभा द्या

सर्व सामान्यांसाठी रेल्वे सुरू करायला हव्यात. रेल्वे सुरू नाहीत. त्यामुळे लसीकरणाचा वेगही कमी आहे. आज प्रवास करायचा म्हटलं तर सातशे रुपये खर्च होतो. डोंबिवलीकरही हैराण आहेत. ज्यांचं लसीकरण झालंय त्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसं पत्रंही त्यांना दिलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (pravin darekar attacks maha vikas aghadi over nana patole statement)

संबंधित बातम्या:

भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, उपचारानंतर प्रकृती स्थिर

तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज, खर्च वाया गेला तरी चालेल पण यंत्रणा तशाच उभ्या राहतील: किशोरी पेडणेकर

प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती; समितीत देसाई, पटोले आणि पाटील

(pravin darekar attacks maha vikas aghadi over nana patole statement)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.