AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ईडी आणि भाजपचा काय संबंध? ही भाजपबद्दलची मतं कलुषित करण्याची खेळी”

ईडी आणि भाजपचा काय संबंध?, असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

ईडी आणि भाजपचा काय संबंध? ही भाजपबद्दलची मतं कलुषित करण्याची खेळी
| Updated on: Nov 24, 2020 | 5:07 PM
Share

यवतमाळ : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या कारवाई नंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका केली जात आहे. त्यानंतर ईडी आणि भाजपचा काय संबंध?, असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी भाजपवरील टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (Pravin Darekar comments on raid of ED on Pratap Sarnaik home)

“ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. ईडीकडे तक्रार केल्यानंतर तसेच त्यांना माहिती मिळाल्यानंतर ते कारवाई करतात. प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्याचा भाजपचा आणि केंद्र सरकारचा काय संबंध?,” असे प्रविण दरेकर म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी  सरकारवरदेखील टीका केली.

“राज्यात सरकारला सर्व स्तरांवर अपयश आलं आहे. त्यांच्याकडून प्रत्येक वेळी आव्हानाची भाषा केली जाते. तसेच प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवलं जातं. प्रत्येक वेळी लोकांची भाजपबद्दलची मतं कलुषित करण्याची खेळी या मंडळींची आहे.” असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. तसेच, ईडीने सर्व प्रक्रिया पूर्ण करवी, ईडीच्या चौकशीतून काही समोर येणार नसेल तर या कारवाईबद्दल कांगावा करण्याची गरज नाही. ईडीला सर्व सहकार्य करुन त्यांना मदत करावी. आपली चूक नसेल तर आरडाओरडा करण्याची काही आवश्यकता नाही, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संजय राऊत यांची भाजपवर टीका

दरम्यान, प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. “गेल्या काही दिवसांपासून ईडी, सीबीआय या यंत्रणा गुलाम आणि नोकर असल्यासारखे वागत असतील तरी आम्ही पर्वा करत नाही. आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाहीयेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दानगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका,” असे राऊत म्हणाले. (Pravin Darekar comments on raid of ED on Pratap Sarnaik home)

संबंधित बातम्या :

टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्स ते संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा पसारा नेमका किती?

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा टोला

‘ईडी’ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.