मुख्यमंत्र्यांकडून सुडाची भाषा संयुक्तिक नाही, दबावातून ठाकरेंची हिंदुत्वाशी विसंगत भूमिका : दरेकर

संविधानात्मक पदावर आव्हानात्मक भाषा योग्य नाही, असं प्रवीण दरेकर 'सामना'तील मुलाखतीवर म्हणाले

मुख्यमंत्र्यांकडून सुडाची भाषा संयुक्तिक नाही, दबावातून ठाकरेंची हिंदुत्वाशी विसंगत भूमिका : दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 11:15 AM

मुंबई : तुम्ही सूडाने वागल्यास आम्ही दसपट सूडाने वागू, अशी भाषा मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीला संयुक्तिक नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमधील मित्रपक्षांचा दबाव किंवा समझोत्यापोटी हिंदुत्वाशी विसंगत भूमिका घेत आहेत, असा आरोपही दरेकरांनी केला. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘दैनिक सामना’साठी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर दरेकरांनी भाष्य केले. (Pravin Darekar talks on CM Uddhav Thackeray interview in Saamana by Sanjay Raut)

“मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीने दहापट सूडाने वागण्याची भाषा करणं संयुक्तिक नाही. ते पक्षप्रमुख नाही, तर एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. त्यांची भूमिका सर्वव्यापी, सर्वसमावेशक असावी. एखादी गोष्ट सूडभावनेतून केल्याचं त्यांना वाटू शकतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून ते संयमाने वागले, मात्र आज आवश्यकता असताना संयम दाखवायला हवा होता. ‘आरेला कारे’ करणं पक्षप्रमुख म्हणून एकवेळ ठीक आहे, पण संविधानाने निर्माण केलेल्या पदावर आव्हानात्मक भाषा करणं योग्य नाही” असं दरेकर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना म्हणाले.

“हिंदुत्वाशी विसंगत भूमिका”

“कोणीही हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची पताका देशभर फडकवली. राज्यातील हिंदुत्ववादी जनतेने त्यांना ही उपाधी दिली. मात्र अलिकडच्या काळात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बनवली, तेव्हा त्यांची हिंदुत्वाची भूमिका पातळ झाली. सरकारमधील मित्रपक्षांचा दबाव किंवा समझोत्यापोटी त्यांनी हिंदुत्वाशी विसंगत भूमिका घेतली. आधी मंदिर मग सरकार अशी त्यांची भूमिका होती. मात्र नंतर राम मंदिराच्या भूमिपूजन ऑनलाईन करण्याची सूचना किंवा इतर टीका टिप्पणी संपूर्ण देशाने पाहिली. काँग्रेसच्या विचारधारेशी जुळवून घेताना मूळ भूमिकेपासून दूर जात असल्याचं चित्र आहे” असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

“वार, सूड, बघून घेऊ, तुमची मुलं बाळं आहेत लक्षात घ्या, अशी वक्तव्यं मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीकडून आतापर्यंत कधीच झाली नाहीत. टोकाचा संघर्ष आणि कार्यकर्त्यांमधील धुमश्चक्रीही पाहिली आहे, परंतु हे चिंताजनक आहे. राजकारणात प्रत्येक पक्ष, प्रत्येक व्यक्ती हा आव्हानाला सामोरा जात असतो. सर्व कार्यकर्ते संघर्ष आणि संकटातून तयार होतात. मात्र अशा प्रकारे धमकावण्याची आवश्यकता नाही. सगळेच काचेच्या घरात राहत असतो, सत्ता येते जाते, ती आज आहे उद्या नाही” असं दरेकरांनी सांगितलं.

“भाजप सूडाचं राजकारण करत नाही, त्यांना तशी आवश्यकता नाही आणि मूळात ते करुही शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सामान्य नागरिकाला हक्क आणि अधिकार दिले आहेत. सीबीआय, ईडी, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना लहर आली, म्हणून कोणी काही करु शकत नाही. ना केंद्र सरकार, ना राज्य सरकार. एखादी कारवाई करुन तात्पुरती सूडभावना शमवू शकता येईल, मात्र ते कोर्टात टिकत नाही. कोर्टाने चपराक लगावल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत” याकडे प्रवीण दरेकरांनी लक्ष वेधलं.

“ठाकरे सरकार नापास”

“मराठवाडा वॉटर ग्रीडसारख्या विकास योजनांना ठाकरे सरकारने स्थगिती दिली. (Pravin Darekar talks on CM Uddhav Thackeray interview in Saamana by Sanjay Raut) अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्याला काही दिलासा मिळाला नव्हता. भाजपने आंदोलन केल्यानंतर दबावातून दहा हजार कोटी मंजूर झाले. मात्र विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आपल्या खात्यात एकही पैसा आला नसल्याचं सांगतात. इतर राज्यांनी कोव्हिड नियंत्रणात आणला, पण महाराष्ट्रात एकही पॅकेज जाहीर झालं नाही. अजूनही सरकार चाचपडत आहे. त्यामुळे शंभरपैकी 35 च्या वर मार्क देऊ शकत नाही. 34 च्या खालीच गुण देईन, कारण हे सरकार पास झालेलं नाही” असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या :

मी नामर्द नाही, ‘ईडी’ वगैरेचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा, उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?; ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल

भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

तुम्ही ड्रायव्हिंग का करताय?, उद्धव ठाकरे म्हणतात…

(Pravin Darekar talks on CM Uddhav Thackeray interview in Saamana by Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.