AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण दरेकरांना वाहतूक कोंडीचा फटका, गाड्यांचा ताफा सोडून गर्दीत लोकलने प्रवास

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. प्रवीण दरेकर यांना आपल्या गाड्यांचा ताफा सोडून चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत कार्यक्रम स्थळी पोहोचावे लागले.

प्रवीण दरेकरांना वाहतूक कोंडीचा फटका, गाड्यांचा ताफा सोडून गर्दीत लोकलने प्रवास
| Updated on: Jan 24, 2020 | 10:58 PM
Share

ठाणे : भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. प्रवीण दरेकर यांना आपल्या गाड्यांचा ताफा सोडून चक्क लोकल ट्रेनने प्रवास करत कार्यक्रम स्थळी पोहोचावे लागले (Pravin Darekar In Local). दिवा येथे पुर्व नियोजित कार्यक्रमाकरता विधान वरीषद विरोधी पक्ष नेते यांना जायचे होते. याकरिता मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंब्रा बायपास ते दिवा असा प्रवास प्रवीण दरेकर यांना करायचा होता (Pravin Darekar In Local).

प्रवीण दरेकर हे मुंबई ते ठाणे ते आपल्या ताफ्यासोबत ठाण्यात आले. मात्र, आधीच मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला होता. त्यात ठाण्यात भाजपा आमदार आणि नेते मंडळी त्यांच्या स्वागता करता उभे होते. प्रवीण दरेकर नेते मंडळींजवळ पोहोचताच ठाणे ते दिवा मोठी वाहतूक कोंडी असल्याचे ठाण्यातील भाजपा नेत्यांनी सांगितले. तेव्हा आता पर्याय काय असं, प्रवीण दरेकर यांनी विचारलं. अखेर त्यांना लोकल ट्रेन ने जाण्याशिवाय काहीच पर्याय उरला नाही. त्यामुळे प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या नेते मंडळींसह गर्दीने भरलेल्या लोकलने दिव्यापर्यंतचा प्रवास केला.

भीमा कोरेगाव प्रकरणी पुन्हा चौकशी म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास : दरेकर

दरम्यान, भीमा कोरेगाव प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याचे सरकारचे प्रयत्न म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवणे आणि त्यांचे खच्चीकरण करणे होय, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केल. तर पुर्वाश्रमीचे मनसेचे आमदार असलेले प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या नवीन झेंड्यावरील राजमुद्रेबाबत राज ठाकरे यांचे समर्थन केलं.

आमच्या सरकारचे सर्व निर्णय चुकीचे ठरवण्याचे दुर्दैवी काम विद्यामान सरकार करतं आहे, अशी टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली. CAA आणि NRC च्या विरोधात जेवढे मोर्चे निघत आहेत, त्यापेक्षा जास्त भारतीय जनतेने या निर्णयाचे स्वागत केलं. शिवाय, राज ठाकरे यांनी CAA आणि NRC बाबत मोदींना दिलेल्या पाठिंब्याचे प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं.

कोकणातील मतदारांनी शिवसेनेला नेहमी मतं दिली. मात्र, आता कोकणाला काही पॅकेज द्यायचे म्हटले, की शिवसेनेने हात आकडता घेतला, है दुर्दैव आहे, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

दिवा येथे ‘अखंड दिवा कोकण मोहोत्सव’ या कार्यक्रमात कोकण रत्न पुरस्काराने प्रवीण दरेकर यांना सन्मानित करण्यात आले.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.