AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC election 2022 : महर्षी यार्डातील (प्रभाग 39) या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यंदा फुलणार का कमळ ?

महर्षी यार्डातील प्रभाग क्रमांक 39 मध्ये चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर आव्हान होते ते भाजापाचे. या काळात बदलाचे वारे होते. त्यामुळे पुणे महापालिकेवरही कमळच फुलले होते. पण महर्षी नगरातील या प्रभागात 4 पैकी ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते.

PMC election 2022 : महर्षी यार्डातील (प्रभाग 39) या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यंदा फुलणार का कमळ ?
पुणे महापालिका
| Updated on: Jun 15, 2022 | 6:24 AM
Share

पुणे : राज्यातील (Municipal elections) महापालिका निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. अंतर्गत हालचाली सुरु झाल्या असून प्रत्येक (Politics Party) पक्षही कामाला लागला आहे. मे महिन्यात आरक्षण जाहीर झाले असल्याने इच्छूक आता गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. (Pune) पुणे महापालिकेत 58 प्रभागात 173 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हे सर्व असले तरी पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून महर्षी यार्डातील प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा डंका पाहवयास मिळाला आहे. चारपैकी तीन वार्डामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. तर दोन नंबरचा पक्ष हा भाजपा ठरला होता. त्यामुळे यंदा या प्रभागात भाजपा सर्वस्व पणाला लावणार की राष्ट्रवादी पक्ष आपला गढ शाबूत ठेवण्यात यशस्वी राहणार हे पहावे लागणार आहे.

चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस

महर्षी यार्डातील प्रभाग क्रमांक 39 मध्ये चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर आव्हान होते ते भाजापाचे. या काळात बदलाचे वारे होते. त्यामुळे पुणे महापालिकेवरही कमळच फुलले होते. पण महर्षी नगरातील या प्रभागात 4 पैकी ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये बाळासाहेब धनकवडे, आश्विनी सागर भागवत, तांबे विशाल विलास यांचा समावेश राहिला आहे. कमी मताधिक्याने का होईना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येथे विज खेचून आणता आला होता.

चारही वार्डामध्ये मुख्य पक्षांमध्ये लढत

पुणे महापालिकेतील प्रभाग क्र. 39 मध्ये खरी लढत झाली ती भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्ये खरी लढत झाली होती. 2 वार्डामध्ये अपक्षांनी नशीब आजमावले होते. मात्र, येथेही त्यांना अपयशालाच सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाच्या उमेदवाराच्या मतामध्ये एवढा फरक राहिलेला नव्हता. पण काही मतांच्या अंतराने का होईना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या ठिकाणी यश मिळाले होते.

चारही वार्डातील अशी आहे मतांची गोळा बोरीज

प्रभाग क्रमांक 39 अ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बाळाभाऊ धनकवडे यांना सर्वाधिक 16 हजार 99 मते मिळाली तर भाजपाचे तपकिर अभिषेक यांना 8 हजार 762 एवढी मते मिळाली. ‘ब’ मध्ये राष्ट्रवादीच्या आश्विनी सागर भागवत यांना 11 हजार 451 मते तर भाजपाच्या मोहिनी देवकर यांना 11 हजार 46 मते मिळाली होती. ‘क’ मध्ये भाजपाच्या वर्षा तापकिर यांना 12 हजार 135 तर राष्ट्रवादीचे श्रध्दा परांडे यांना 10 हजार 486 मते मिळाली होती. व ‘ड’ राष्ट्रवादीचे विशाल तांबे यांना 11 हजार 621 व भाजपाचे गणेश भिंताडे यांना 10 हजार 308 असे मतं होती.

प्रभाग निहाय उमेदवार

प्रभाग क्र. 39 अ मधील उमेदवार

बटाणे अनिल भीमाशंकर (शिवसेना)

धनकवडे बाळाभाऊ (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

सुतार ऋषी अनंता (मनसे)

तापकीर अभिषेक अर्जून (भाजपा)

उमेदवारपक्ष विजयी/ आघाडी
धनकवडे बाळाभाऊ राष्ट्रवादी विजयी उमेदवार
बटाणे अनिल भीमाशंकर शिवसेना
सुतार ऋषी अनंतामनसे
तापकीर अभिषेक अर्जून भाजपा

प्रभाग क्र. 39 ब मधील उमेदवार

आश्विनी सागर भागवत (कॉंग्रेस)

देवकर मोहिनी राजेंद्रकुमार (भाजपा)

परदेशी किरण पांडूरंग (अपक्ष)

पवार निकिता संजय (शिवसेना)

उमेदवारपक्षविजयी/आघाडी
आश्विनी सागर भागवतराष्ट्रवादीविजयी
देवकर मोहिनी राजेंद्रकुमार भाजपा
पवार निकिता संजय शिवसेना
परदेशी किरण पांडूरंगअपक्ष

प्रभाग क्र. 39 क मधील उमेदवार

भोसले तेजश्री अनिल (शिवसेना)

चव्हाण सुवर्णा विकास (अपक्ष)

कोंडे ज्योती प्रवीण (मनसे)

परांडे श्रध्दा गोरक्ष (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

तापकिर वर्षा विलास (भाजपा)

उमेदवार पक्षविजयी / आघाडी
तापकिर वर्षा विलास भाजपाविजयी
परांडे श्रध्दा गोरक्षराष्ट्रवादी
कोंडे ज्योती प्रवीण मनसे
भोसले तेजश्री अनिलशिवसेना

प्रभाग क्र. 39 ड मधील उमेदवार

आंदोली नरसिंगरावर लिंगय्या (अपक्ष)

भिंताडे गणेश उत्तम (भाजपा)

गोगावले चंद्रकांत शिवाजी (मनसे)

खेडेकर सुनिल पांडूरंग (शिवसेना)

तांबे विशाल विलास (राष्ट्रवादी कॉग्रेस)

उमेदवारपक्षविजयी / आघाडी
तांबे विशाल विलास राष्ट्रवादीविजयी
खेडेकर सुनिल पांडूरंग शिवसेना
गोगावले चंद्रकांत शिवाजीमनसे
भिंताडे गणेश उत्तमभाजपा
आंदोली नरसिंगरावर लिंगय्याअपक्ष

असा विभागला गेला आहे प्रभाग क्र. 39

प्रभाग क्र 39 हा महर्षी नगरातील मार्केट यार्ड चा परिसर आहे. यामध्ये डीएसके, चंद्रदीप, टी.एम.बी. कॉलनी, पारसनीस कॉलनी, आंबेडकर नगर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पंचदीप कॉलनी, कुमार सिध्दवाला सोसायटी, वेगा सेंटर स्वारगेट, आयकर कार्यालय, मुकूंद नगर, कुमार पुरम, झांबरे पॅलेस. गुलटेकडी, इंदिरानगर, प्रेमनगर, हमाल नगर, कटारिया हायस्कूल या भागाचा समावेश होतो.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.