AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhakrishana Vikhe Patil : ‘या दळभद्री महाविकास आघाडी सरकारने’, काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?

Radhakrishana Vikhe Patil : छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, 'मला त्याची कल्पना नाही. त्यांच्या आरोपामागची भूमिका मला माहित नाही' बंजारा समाज आक्रमक झाला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, 'काही आंदोलनं होतात. त्या समाजाचे ते अधिकार आहेत'

Radhakrishana Vikhe Patil : 'या दळभद्री महाविकास आघाडी सरकारने', काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?
Radhakrishana Vikhe Patil
| Updated on: Sep 19, 2025 | 11:33 AM
Share

“त्यांना काय वाटतं हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाहीय. आम्ही निर्णय केलाय पुढे चाललोय. त्यांना काही शंका असतील, तर न्यायालयाची दार आहेत. सरकारने फसणूक केली असेल तर त्यांनी न्यायालयात जावं” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. “चांगले वकील देणार. सरकार बाजू तिथे मांडणार, ही सरकारची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस यांची पहिल्यापासून कमिटमेंट आहे. 2014 ते 2019 दरम्यान मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण दिलं.ते सुप्रीम कोर्टात टिकलं. पण या दळभद्री महाविकास आघाडी सरकारने ते घालवलं. पण त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“आरक्षणाचे मारेकरी तुम्ही आहात. महाविकास आघाडीचे लोक आहेत. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. त्यांनी आरक्षण घालवलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्यांचा सातत्याने आग्रह आहे, सर्वसमावेशक आरक्षण मिळाल पाहिजे” असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. “सर्वोच्च नायायलयात बाजू मांडली. मविआने वकिलांचे पैसे दिले नाहीत. आज विचारवंत पुढे आले, त्यांनी या महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं पाहिजे” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

छगन भुजबळांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांवर काय म्हणाले?

छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘मला त्याची कल्पना नाही. त्यांच्या आरोपामागची भूमिका मला माहित नाही’ बंजारा समाज आक्रमक झाला आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘काही आंदोलनं होतात. त्या समाजाचे ते अधिकार आहेत’

आता शातंता राखली पाहिजे

मराठा-ओबीसी वाद सुरु आहे, वातावरण कलुषित झालं आहे. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, “दोन्ही समजाच्या नेत्यांना विनंती आहे की, आता शातंता राखली पाहिजे. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. ओबीसी नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ होण्याची गरज नाही. आता जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे. संयमाने पुढे गेलं पाहिजे, भाष्य केलं पाहिजे. “गोलमेज परिषद ही अधिकृत संस्था नाही. त्यांच्याबद्दल कुठलाही दुराग्रह नाही. त्यांच्याशी सुद्धा चर्चा करेन” असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता