काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय, विखेंचा पहिल्यांदाच बांध फुटला

शिर्डी :  काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय, अशी टीका काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या पक्षावर जाहीर टीका केली. तसेच उद्या सकाळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय. विखेंचे चिरंजीव भाजपात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पक्षावर […]

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय, विखेंचा पहिल्यांदाच बांध फुटला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

शिर्डी :  काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय, अशी टीका काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षावर केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत:च्या पक्षावर जाहीर टीका केली. तसेच उद्या सकाळी मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असंही त्यांनी जाहीर केलंय. विखेंचे चिरंजीव भाजपात गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पक्षावर जाहीरपणे टीका केली. त्याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राधाकृष्ण विखेंनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखेंनी जाहीरपणे सुजय विखेंचा प्रचार करत असल्याचंही दिसून आलं होतं. मुलाने भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखेही प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.

“… तर मी माझ्या मुलाच्या मागे का उभे राहू नये?”

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील श्रीरामपूरमध्ये आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी ‘मी भाजपचा उघड प्रचार केला, मला कोणाची भीती आहे’ असा सवालही राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसला केला. तसेच काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष एका नेत्याच्या मागे उभा राहिला आहे. मग मी माझ्या मुलाच्या मागे का उभे राहू नये? असाही प्रश्न त्यांनी काँग्रेसला केला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेकांना कधी विखेंना बाहेर काढतो आणि मी नेता होतो, अशी घाई झाली आहे, अशी खोचक टीका त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. तसेच नेता व्हायला लोकांच्या मनात जागा असावी लागते, असा टोलाही राधाकृष्ण विखेंनी थोरात यांना लगावला.

“बॅनरवरुन फोटो काढले, आता लोक भुलथापांना बळी पडणार नाहीत”

‘मी पक्षात असताना माझ्यावर टीका केली, बॅनरवरून माझे फोटो काढले’ असेही ते म्हणाले. काँग्रेस पक्ष प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय. आज यांना विखेंचं महत्त्व कळलंय म्हणून यांनी माझे फोटो पोस्टर लावले. पण तुम्ही माझे कितीही फोटो वापरुन लोकांना भुलवण्याचा प्रयत्न केला तरी लोक तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही, असे राधाकृष्ण विखे पाटलांनी काँग्रेसविरोधात बोलताना सांगितले.

मी उद्या सकाळी माझी भूमिका स्पष्ट करेन, असेही राधाकृष्ण विखेंनी जाहीर सभेत सांगितले. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिर्डी मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पण त्यापूर्वीच काँग्रेसला या मतदारसंघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, या मतदारसंघात विखे पाटलांचं वर्चस्व मानलं जातं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.