Rahul Gandhi | राहुल गांधींचं कमबॅक, पुन्हा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार : सूत्र

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या 15 ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्षपद बहाल केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली

Rahul Gandhi | राहुल गांधींचं कमबॅक, पुन्हा काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारणार : सूत्र
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 12:54 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता बळावली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Rahul Gandhi likely to become Congress National President once again)

काँग्रेस वर्किंग कमिटीच्या 15 ऑगस्टनंतर होणाऱ्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्षपद बहाल केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.  काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गेल्या महिन्यात झाली. या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीची (एआयसीसी) वर्चुअल बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली होती.

हेही वाचा : राहुल गांधींना पुन्हा अध्यक्षपदाची खुर्ची द्या, काँग्रेसच्या बैठकीत मागणीला जोर

गहलोत यांच्या मागणीला पक्षातून काही नेत्यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा होती. मात्र पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत राहुल गांधींनी त्यावेळी मौन बाळगले होते. परंतु आधी ज्योतिरादित्य शिंदे यांचे पक्षांतर आणि आता सचिन पायलट यांनी पुकारलेले बंड पाहता राहुल गांधी यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा

राहुल गांधी यांची 2017 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राहुल गांधींनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी पक्षप्रमुख म्हणून त्यांची जागा घेतली. परंतु गेल्या वर्षभरापासून राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पुन्हा जबाबदारी देण्याची मागणी पक्षातून केली जात आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

50 वर्षीय राहुल गांधी सलग चौथ्यांदा लोकसभा खासदारपदी निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून 2004 पासून सलग तीन वेळा ते निवडून आले. मात्र 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. परंतु केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढवली होती. या जागेवर ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले.

राहुल गांधी यांनी 2007 ते 2013 या काळात काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तर 2013 ते 2016 या तीन वर्षांसाठी ते पक्षाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर 2017 मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून निवड झाली. (Rahul Gandhi likely to become Congress National President once again)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.