राहुल गांधींनी मनातली सल सांगितली, म्हणाले, ‘संजयजी तृणमूल आणि आपच्या मत विभाजनाने भाजपला फायदा!’  

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. आजच्या सामनाच्या रोकठोकमधून त्यांनी या भेटीचा तपशील लिहिला आहे. यावेळी राहुल गांधींसोबतच्या चर्चेत राष्ट्रीय राजकारणासंबंधी एक मोठी खंत बोलून दाखविल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधींनी मनातली सल सांगितली, म्हणाले, 'संजयजी तृणमूल आणि आपच्या मत विभाजनाने भाजपला फायदा!'  
संजय राऊत आणि राहुल गांधी
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 8:29 AM

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. आजच्या सामनाच्या रोकठोकमधून त्यांनी या भेटीचा तपशील लिहिला आहे. यावेळी राहुल गांधींसोबतच्या चर्चेत राष्ट्रीय राजकारणासंबंधी एक मोठी खंत बोलून दाखविल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि आप मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करुन देत आहेत, अशी सल त्यांनी राऊतांजवळ बोलू दाखवली

आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करुन देतायत, राहुल गांधींना खंत

आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवल्याचं राऊतांनी रोखठोकमध्ये म्हटलंय.

काँग्रेस कमजोर करणं आणि त्यातून स्वत: वाढणं हे भाजपला सोयीचं

तृणमूल व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते, असंही रोखठोकमध्ये राऊतांनी म्हटलं आहे.

ममतांना देशात स्वीकारार्हता नाही, केजरीवाल दिल्लीचे मांडलिक

ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारार्हता नाही व केजरीवाल हे केंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे. हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही. या सगळ्यांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मोदी व शहांचेही तेच मत आहे. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे.

राहुल गांधींचं एक वाक्य, संजय राऊत म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा!

उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा.

संजय राऊत आणि राहुल गांधींची भेट

मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधीं यांना भेटले. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात राहुल गांधी यांनी केली. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचं पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले.

‘पंजाबचा तिढा सुटला काय?” – संजय राऊत ‘नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.” – राहुल गांधी. ‘सिद्धूचे काय करणार?” – संजय राऊत ‘तेसुद्धा शांत होतील.” – राहुल गांधी.

(Rahul Gandhi told Sanjay Raut BJP benefits from Trinamool and AAP Vote division)

हे ही वाचा :

राहुल गांधींबरोबर अर्धा तास चर्चा, भेटीतला शब्द न शब्द संजय राऊतांनी सांगितला, म्हणाले, ‘राहुलजी तो दिवस लवकर उजाडो’

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.