AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंची धडाकेबाज एण्ट्री, सलामीलाच विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS candidates ) विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. इतकेच नाही तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज मनसेचे (MNS candidates ) दोन उमेदवारही जाहीर केले.

राज ठाकरेंची धडाकेबाज एण्ट्री, सलामीलाच विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 30, 2019 | 1:20 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS candidates ) विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. इतकेच नाही तर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आज मनसेचे (MNS candidates ) दोन उमेदवारही जाहीर केले. मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील (Dharma Patils son Narendra Patil) यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले. हे दोघेही मनसेकडून निवडणूक लढवतील असं यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

दोन उमेदवार जाहीर

राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील आणि दिलीप दातार यांना पक्षप्रवेश देताना त्यांची उमेदवारीही जाहीर केली. नरेंद्र पाटील हे धुळे जिल्ह्यातील विखरण गावचे आहेत. त्यांचे वडील धर्मा पाटील यांनी गेल्यावर्षी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केलं होतं, त्यांचा उपचारादरम्यान 28 जानेवारीला निधन झालं होतं.  नरेंद्र पाटील यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे अद्याप जाहीर केलं नसलं तरी ते धुळ्यातूनच लढतील अशी आशा आहे.

दिलीप दातार

नाशिक महापालिकेतील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांनीही आज मनसेमध्ये प्रवेश (Shivsena Corporator in MNS) केला. दिलीप दातार नाशिक महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. मात्र त्यांनी कालच नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. मनसेकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून दिलीप दातार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. शिवसेनेतून तिकीट मिळण्याची आशा संपल्याने दातार यांनी पक्षांतर (Shivsena Corporator in MNS) केल्याचं बोललं जात आहे. युती झाल्यास नाशिक पश्चिमची जागा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे आणि तिथून कोणाला उमेदवारी मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

राज ठाकरेंचा पुढचा प्लॅन काय?

यावेळी राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधतील अशी आशा होती, मात्र त्यांनी  पुढचा प्लॅन न सांगता जाता जाता फटकेबाजी केली.

राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं सांगितलं. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करेन, रोज चार-पाच नावं जाहीर करेन, असं  ते म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांना पत्रकारांनी किती जागा लढवणार, प्रचारसभा कुठे कुठे घेणार, ब्लू प्रिंटचं काय असे प्रश्न विचारले.

राज ठाकरे म्हणाले, “कैलासवासी धर्मा पाटील, आपल्याला कल्पना असेल, त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. आपल्या पक्षातर्फे ते निवडणूकही लढवणार आहेत. याशिवाय नाशिकचे नगरसेवक दिलीप दातार यांनीही मनसेत प्रवेश केला. ते देखील मनसेतर्फे निवडणूक लढवतील. आता मी रोज चार-पाच नावं सांगत जाईन”.

यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना तुमच्या पक्षातही इनकमिंग सुरु झाली आहे का? असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे आपल्या शैलीत म्हणाले “फोन सध्या चालू आहेत.  नेमक्या किती जागा लढणार हे योग्य वेळी सांगेन. आजच्या पक्षप्रवेशासाठी मीडियाला बोलावलं आहे, पत्रकार परिषदेसाठी नाही”.

मनसेचा मेळावा

मनसेने मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता (MNS Vidhansabha election) वर्तवली जात आहे. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणती ‘राज’गर्जना करणार याची कार्यकर्त्यांसह सर्वांनाच (MNS Vidhansabha election) उत्सुकता लागून राहिली आहे.

मनसे 122 जागा लढणार?

यंदाच्या विधानसभेला मनसे उभे राहणार नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर मनसेने (MNS Vidhansabha election) थेट उमेदवारांची चाचपणी सुरु केली होती. यात मनसेने 122 जागांची तयारी केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिकमधील सर्व जागा मनसे लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील 36 पैकी 36 जागा, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मराठवाडा 42 पैकी 22, विदर्भ 62 पैकी 15, कोकण 15 पैकी 10, उत्तर महाराष्ट्र – चाचपणी सुरु, अशी मनसेने तयारी केली आहे.

संबंधित बातम्या  

मुंबई 36 पैकी 36, ठाणे 24 पैकी 24, नाशिक 15 पैकी 15, मनसेची 122 जागांची तयारी

राज ठाकरेंकडून उमेदवारांची चाचपणी सुरु, राज्यात प्रचारसभांचीही रणधुमाळी  

शिवसेना नगरसेवकाचा पक्षाला रामराम, राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेप्रवेश 

विधानसभेसाठी शिवसेनेकडून मनसेला शुभेच्छा  

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?