AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : सोशल मीडियावर पक्षाविरोधात कमेंट कराल तर एका क्षणात पक्षातून हाकलून देईन, खूप पुरवले तुमचे चोचले; राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कान उपटले

'तुमचे चोचले आता खूप पुरवले. तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा,' राज ठाकरेंचा मनसैनिक, पदाधिकाऱ्यांना इशारा.

Raj Thackeray : सोशल मीडियावर पक्षाविरोधात कमेंट कराल तर एका क्षणात पक्षातून हाकलून देईन, खूप पुरवले तुमचे चोचले; राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचे कान उपटले
मनसे प्रमुख राज ठाकरेImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Aug 23, 2022 | 3:12 PM
Share

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय. पक्षातील वाद सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणाऱ्यांचे राज ठाकरे यांनी यावेळी चांगलेच कान उपटले. ते म्हणाले की, ‘पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉट्सअप सोशलम मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, असा दमच राज ठाकरे यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकारी आणि मनसैनिकांना दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने मनसे पदाधिकाऱ्यांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

स्लो पॉईजन देताय

राज ठाकरे यांनी यावेळी राज्याच्या राजकारणावर भाष्य करताना काही मुद्दे देखील मांडले. ते म्हणाले की, ‘चांगल्या क्षेत्रातील महिलांनी पुरुषांनी राजकारणात आलं पाहिजे. मी याबाबत एक पत्रं काढणार आहे. राजकारण खूप विस्तारलेलं आहे. फक्त निवडणुका ही गोष्टच नाही. राजकारणाला तुम्ही तुच्छ मानता आणि त्यासाठीच दोन दोन तास रांगेत उभं राहून मतदान करता. मग तुच्छ कसं. आपल्याकडे कीड लागली आहे. जातीच्या, धर्माच्या नात्याच्या नावाने मतदान करत असतो. आपल्या राज्याने देशाला मार्गदर्शन केलं. यूपी बिहारसारखं राजकारण आपल्या राज्यात घुसत आहे. सर्वांना मत मागणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे. आपल्याविरोधात प्रचार करतात. स्लो पॉईजन देत आहेत. ते तिथेच छाटा.’

पुढे बोलताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सल्लाही दिला. ते म्हणाले की,’माझं भाषण मुलाखतीत मी जे बोलतो त्याचे मुद्दे काढा. त्याचा प्रचार करा. लोकांना ते सांगा. फक्त आंदोलन करून चालत नाही. तुम्ही प्रमुख पदावर आहात. त्या पदाची शान राखा.’

राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना फटकारताना काय म्हणालेत?

  1. पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉट्सअप सोशलम मीडियात फेसबुकवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट करू नये
  2. असं केल्यास त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही हे लक्षात ठेवा
  3. तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं.
  4. तुमचं काम सांगायॉचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा.
  5. जर उणीदुणी काढत असाल तर काढून तर बघा.
  6. कुणी जर काढलं असेल तर माझ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे

निवडणुका कधीही लागतील

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात, असं म्हटलंय. ‘निवडणुका कधी होतील माहीत ननाही अग अग म्हशी हेच चालू आहे. निवडणुका कधीही लागतील. दिवाळीच्या आधी लागतील असं वाटत नाही. नोव्हेबंर डिसेंबर कदाचित जानेवारी आणि फेब्रुवारीतही लागतील. चिखल झालाय. कारण कोणी विचारणारा नाही. आता जिल्हा परिषदा पुढे ढकलल्या. महापालिका तीनचं की दोनचं. वॉर्डाला तीन माणसं चार माणसं. लोक काय गुलाम आहेत का. त्यांना नगरसेवकही माहीत नसतं. चार चार माणसांचा प्रभाग करताय. तो भाग कोणी बघायचा. कुणाला कळत नाही. कुठे जावं. कारण लोक जाब विचारत नाही. एकदा लोकांनी ठरवलं पाहिजे. खेळ मांडलाय नुसता. गृहित धरलंय लोकांना. तीनचा चारचा एकचा प्रभाग करा. लोकं येतील, जातील कुठे , त्यात पैसे वाटण्याची सुरुवात होते. आज नाही लक्षात येणार. काही वर्षानंतर लक्षात येईल. काय महाराष्ट्र होता आणि काय मातेरं केलं.’

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...