AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : ‘..तेव्हा राज ठाकरे कुठे होते’, उद्धव ठाकरेंचा सवाल; तर राज ठाकरेच बाळासाहेबांचे खरे वारसदार, मनसेची बॅनरबाजी

औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज ठाकरेच आहेत, असे बॅनर सभास्थळावर पाहायला मिळत आहेत.

Raj Thackeray : '..तेव्हा राज ठाकरे कुठे होते', उद्धव ठाकरेंचा सवाल; तर राज ठाकरेच बाळासाहेबांचे खरे वारसदार, मनसेची बॅनरबाजी
राज ठाकरेंच्या सभेत मनसैनिकांची बॅनरबाजीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 01, 2022 | 5:30 PM
Share

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुनही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) अल्टिमेटम दिलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज औरंगाबादेत (Aurangabad) जाहीर सभा होत आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी 15 हजाराची मर्यादा घालून दिलीय. मात्र, सभेला 1 लाखापेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. मराठवाड्यासह राज्यभरातून मनसे कार्यकर्ते औरंगाबादेत दाखल झाले आहेत. औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज ठाकरेच आहेत, असे बॅनर सभास्थळावर पाहायला मिळत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसे कार्यकर्त्यांचं उत्तर?

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी शिवसेना प्रवक्ते, आमदार, खासदारांची बैठक पार पडली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिद पाटील तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंचं काय सुरु होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. इतकंच नाही तर भोंगेवाले कोण आणि पुंगीवाले कोण याकडे मी लक्ष देत नाही, अशी खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी आज एका मुलाखतीत बोलताना लगावलाय.

‘राज ठाकरेंच बाळासाहेबांचे खरे वारसदार’

दुसरीकडे राज ठाकरे हेच खरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार असल्याचे बॅनर राज ठाकरे यांच्या सभास्थळावर पाहायला मिळत आहे. हे बॅनर म्हणजे एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना उत्तर असल्याचं मनसे कार्यकर्ते बोलत आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आले आहेत. मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी उचलून धरलेला हिंदुत्वाचा मुद्दा योग्यच असल्याचं मत हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

भोंग्यांचा मुद्दा गौण – मुख्यमंत्री

नोटाबंदी, लॉकडाऊन देशभर केली तशी भोंगाबंदी देशभर करा, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केली आणि भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांना चपराक लगावली. भोंग्यांचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. न्यायालयाने निकाल दिल्यानुसार भोंगे सुरू आहेत. त्यामुळे भोंग्यांचा विषय गौण असून विकास हा मुद्दा आमच्यासमोर महत्त्वाचा आहे, असं मुख्यमंत्री आज एका मुलाखतीत म्हणाले.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.