AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा? माँ कांचनगिरींची भेट, हिंदू राष्ट्र अजेंडा, शिवसेना घेरली जाणार?

आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या तोंडावर अयोध्या दौरा घोषित करुन राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्राचा अजेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा? माँ कांचनगिरींची भेट, हिंदू राष्ट्र अजेंडा, शिवसेना घेरली जाणार?
कांचनगिरी, सूर्यकांतजी यांचं राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचं निमंत्रण
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 2:59 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चाही या झाली. या भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण देण्यात आलं आणि राज ठाकरे यांनीही ते स्वीकारलं आहे. राज ठाकरे नववर्षाच्या तोंडावर म्हणजे डिसेंबरमध्ये अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या तोंडावर अयोध्या दौरा घोषित करुन राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्राचा अजेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे. (Raj Thackeray likely to visit Ayodhya in December 2021)

राज ठाकरे, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची ही भेट ठरवून झाली आहे. दोन्ही महाराज आहे. या भेटीत हिंदू राष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रासाठी योग्य वाटतो, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते, पण कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळो तो दौरा रद्द करावा लागला. अयोध्येच्या आखाड्यातून अनेक लोक बोलावत आहेत. आजोबा, पणजोबापासून हिंदुत्व त्यांच्यात भिनलं आहे. राज ठाकरे हे कणखर हिंदुत्व मांडू शकतात. देशातून भावना आहे की राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे. उत्तर भारतीयांबाबत कोणतेही गैरसमज नव्हते. ते माध्यमांनी निर्माण केले. त्यावेळी राज्य विकासाला न्या ही एक भावना होती, असंही नांदगावकर म्हणाले. दरम्यान, 23 तारखेला भांडूपमधील मेळाव्यात सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, असंही नांदगावकर म्हणाले.

शिवसेना घेरली जाणार?

राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसोबत मिळून सत्ता स्थापन केलीय. त्यामुळे शिवसेनेला आपला हिंदुत्वाची भूमिका काहीशी सौम्य करावी लागल्याचं मागील दोन वर्षात पाहायला मिळत आहे. अशावेळी मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याचं दिसतंय. त्यातच मनसे आणि भाजपची वाढती जवळीक पाहता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना घेरली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भगवं पोस्टर

दरम्यान, गेल्यावर्षी मनसेच्या पहिल्या अधिवेशनानिमित्त मुंबईत दादरमधील शिवसेना भवनासमोर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो असलेलं भगवं पोस्टर लावण्यात आलं होतं. ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ असं या पोस्टरवर लिहिलं होतं. सेनाभवनासमोर हे भव्य पोस्टर लावण्यात आलं होतं. त्यानंतर, मराठी आणि हिंदुत्व यांची सांगड घालणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्मा’वर मनसे पुढची वाटचाल करणार का? याबाबत चर्चा सुरु झाली होती.

इतर बातम्या :

‘सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते’, तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन चित्रा वाघांचा जोरदार टोला

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ए. टी. पाटील पुन्हा सक्रिय, ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

Raj Thackeray likely to visit Ayodhya in December 2021

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.