AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक करा, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांची मागणी; राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत असल्याचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिकळांनी बांधली असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या या दाव्यानंतर आता नवा वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केलीय.

Raj Thackeray : राज ठाकरेंना अटक करा, संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांची मागणी; राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत असल्याचा आरोप
प्रवीण गायकवाड यांचा राज ठाकरेंवर आरोपImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 02, 2022 | 6:09 PM
Share

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण (Caste Politics) केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राजकारणात जातीवादाचं विष पेरलं गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिकळांनी बांधली असा दावाही राज ठाकरे यांनी केलाय. राज यांच्या या दाव्यानंतर आता नवा वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केलीय.

‘खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न’

राज्यात सध्या अस्वस्थता पसरली आहे. सध्या खोटा इतिहास सांगून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली होती. लोकणान्य टिळकांनी जिर्णोद्धार केला नाही. त्यांनी वर्गणी गोळा केली आणि जिर्णोद्धार करणं बाजूला राहिलं. त्यांनी समाधी जवळ वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवला आणि वाद घडवून आणला, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.

जेम्स लेन यांचं मूळ पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं पुस्तक यातील शिवाजी महाराज जन्म आणि दादोजी कोंडदेव यांच्याबाबत केलेलं लिखाण सारखं आहे. नंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाच्या कॉपी आलेली आहे. त्यात मग दादोजी कोंडदेव यांच्याबाबत लिहिलेलं लिखाण का वगळलं, असा सवाल गायकवाड यांनी केलाय.

‘राज ठाकरेंना अटक करा’

राज ठाकरे जातीवादाचं राजकारण करत आहेत. राज ठाकरे यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे यांना अटक करुन शांतता प्रस्थापित करा. आम्ही या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे खोटा इतिहास पसरवत आहेत, असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय.

टिळकांकडे ब्राह्मण म्हणून बघणार का? – राज ठाकरे

‘तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं. मग एवढचं आहे, तर मग रायगडावरची समाधी ही कुणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली ती आमच्या लोकमान्य टिकळांनी बांधली. लोकमान्य टिकळांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिकळांनी जे पहिलं वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव काय, मराठा… हे पवारसाहेब कधी सांगणार नाहीत’, असा घणाघात राज ठाकरे यांनी रविवारच्या सभेत केलाय.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.